टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा

On: June 12, 2026 12:14 PM
Follow Us:

Vidhan Parishad Election 2026 Abhijeet Patil: उत्तम जानकर अन् अभिजीत पाटलांचा विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ

Vidhan Parishad Election 2026: सोलापूर विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार वसंत देशमुख यांच्याविरोधात उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या दोघांनी वसंत देशमुख (Vasant Deshmukh) यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला पाठिंबा देऊ केली आहे. गुरुवारी यासंदर्भात सोलापूरमध्ये (Solapur Vidhanparishad) एक बैठक पार पडली. यानंतर अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या मनातील सगळी खदखद व्यक्त केली. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि त्यांच्याशी संबंधित आघाडीची आज बैठक होती. वाद मिटवण्यासाठी आम्हाला कोणी काय बोलवलं नाही, कुठलीही चर्चा झाली नाही. जे उमेदवार उभे आहेत ते एकदा ही भेटले नाहीत किंवा एक फोनही केला नाही. महायुतीचे उमेदवार मला 4-4 वेळा फोन करतात, हे फोनही करत नाही, आम्ही त्याला काय करणार, असे अभिजीत पाटील यांनी म्हटले. (Vidhan Parishad Election 2026 News)

माझ्याबरोबर निवडून आलेले जिल्हापरिषद सदस्य हे घड्याळ चिन्हावर निवडून आलेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एक होतील यादृष्टीने अजित दादांसोबत बैठक करून सगळे सदस्य घड्याळवर उभे केले होते. आता घड्याळच महायुती सोबत आहेत, त्यामुळे त्यांनी बैठकीला बोलवल्यामुळे मी आलो होतो. राष्ट्रवादी शरद पवार गटाने जो उमेदवार दिलेत त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. वसंतनाना देशमुख यांनी आमची पंचायत समिती पाडली, त्यामुळे त्यांना मदत करायची नाही हे आमचं मतं होतं  त्यामुळे आमच्या लोकांची त्यांच्यासोबत जायची इच्छा नाही, असे अभिजीत पाटील यांनी म्हटले.

Uttam Jankar: मोहिते पाटलांसाठी मी विमानातून उडी मारली; पण त्यांनी विश्वासघात केला: उत्तम जानकर

विधान परिषद निवडणुकीत मोहिते पाटील यांनी माझ्यासोबत विश्वासघात केला. माझ्या मुलाला विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे करण्याचा ठरले होते. मात्र मोहिते पाटील यांनी वसंत देशमुख यांना उमेदवारी फायनल केली. त्यामुळे मी या विधान परीषद निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत नसून महायुतीसोबत जाणार आहे, अशी भूमिका उत्तम जानकर यांनी जाहीर केली आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मोहिते पाटलांची भूमिका सातत्याने अशीच राहिली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शेकापने मिळून राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे. विधानसभेला मी आमदार होऊ नये यासाठी मोहिते पाटलांनी वेगवेगळ्या गोष्टी केल्या. माझ्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी केली. जास्तकाळ मोहिते पाटील कुटुंबासोबत कोणी राहू शकत नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील निर्णय करतात, मात्र त्यांच्याच कुटुंबातील मागचे निर्णय फिरवतात, अशी टीका उत्तम जानकर यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now