टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत रवा-ब्रेड टोस्ट, लहान मुलांना नक्कीच आवडेल

On: June 11, 2026 1:14 PM
Follow Us:

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रवा ब्रेड टोस्ट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होतो. जाणून घ्या रवा ब्रेड टोस्ट बनवण्याची रेसिपी.

१० मिनिटांमध्ये बनवा चमचमीत रवा-ब्रेड टोस्ट

सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, ब्रेड जॅम इत्यादी ठराविक पदार्थ खाल्लेले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाल्ल्यानंतर खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी एक तर विकतचे पदार्थ नाश्त्यात आणले जातात किंवा पॅक बंद पदार्थ खाल्लेले जातात. पण सतत तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि इतर समस्या वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये रवा-ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. रवा आणि ब्रेडचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. लहान मुलांच्या डब्यात सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. यामुळे संपूर्ण दिवस पूर्णपणे आनंद आणि उत्साहात जातो. चला तर जाणून घेऊया रवा ब्रेड टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • रवा
  • ब्रेड
  • मीठ
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • चिलि फ्लेक्स
  • लाल तिखट
  • बटर
  • दही

कृती:

  • रवा ब्रेड टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका वाटीमध्ये रवा, दही, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र करून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्यात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
  • ब्रेडच्या स्लाइसवर तयार केलेले रव्याचे मिश्रण एका बाजूला व्यवस्थित पसरवून घ्या.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात बटर किंवा तेल घालून रव्याचे मिश्रण लावून ठेवलेला भाग तेलात सोडून ५ ते ६ मिनिटं मंद आचेवर भाजा.
  • त्यानंतर दुसऱ्या बाजूने ब्रेड पूर्णपणे कुरकुरीत करून घ्या. त्यानंतर त्यावर चीज आणि बारीक शेव घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रवा ब्रेड टोस्ट. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now