टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती

सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून करण्यात आला आहे.

Monsoon Red Alert:

राज्यभरात कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच काल (शनिवार ६ जून) राज्यातील अनेक भागात पावसाचे आगमन झाले. पुण्यातील बारामती, इंदापूर तासेसिक्सह सातारा जिल्ह्यातील काही भागांत जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अनेक भागात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ९ जूनपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सूनचा वेग मंदावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून करण्यात आला आहे. या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे.

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

 

दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाचे शेतकरी, नागरीकांना आवाहन

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असे आव्हान करण्यात आले आहे. याशिवाय, नागरिकांनी विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Sunil Tatkare: रोहित पवारांना कोण विचारतंय? सुनिल तटकरेंनी भाजप प्रवेशाची हिस्ट्रीच काढली; म्हणाले, हडपसरमधून उमेदवारी..

Sharad Pawar:… तर सत्ताधाऱ्यांना किंमत मोजावी लागेल…गॅस दरवाढीचा भडका… शरद पवारांचा थेट इशारा

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण

महाराष्ट्रात एक असं गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस, तुम्हाला या ‘गोल्डन व्हिलेज’ची कहाणी माहिती आहे का?

90 किमी ताशी वेगाने वारे धडकणार, 17 राज्यात इशारा, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल, थेट इशारा..

वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?