टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

वडापाव, समोसे विकणाऱ्यांकडे तुकाराम मुंढेंची वक्रदृष्टी वळाली, एफडीएचा कारवाईचा इशारा, नेमकं कारण काय?

Tukaram Mundhe Vada Pav: वडापाव-समोसा पेपरमध्ये नाही बांधायचा मग कशात मिळणार? तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचा मोठा निर्णय

Tukaram Mundhe FDA Vada Pav: अन्न व औषध प्रशासन विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोर आणि साठेबाजांना सळो की पळो करुन सोडणारे डॅशिंग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची वक्रदृष्टी आता वडापाव आणि समोसा विक्रेत्यांकडे वळली आहे. बाजारपेठेत मिळणाऱ्या वडापाव (Vada Pav) आणि समोसा (Samosa) ग्राहकांना बांधून देण्यासाठी सर्रासपणे वर्तमानपत्रांच्या कागदाचा वापर होतो. मात्र, यापुढे वडापाव, समोसा आणि तत्सम खाद्यपदार्थ वर्तमानपत्रांच्या कागदात गुंडाळून विकता येणार नाही, असा आदेश अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने दिला आहे. तुकाराम मुंढे यांची प्रतिमा आणि कठोर शिस्त पाहता इतर सरकारी निर्णयांप्रमाणे या आदेशात सेटलमेंट होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आता समोसा आणि वडापाव विकणाऱ्यांना लवकरात लवकर वर्तमानपत्राच्या कागदाला पर्याय शोधावा लागणार आहे. तसे न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई अटळ मानली जात आहे. तुकाराम मुंढे यांनी चार्ज घेतल्यापासून अन्न व औषध विभागाने राज्यभरात अनेक ठिकाणी धाडी टाकून भेसळीचा माल जप्त केला आहे. संबंधित विक्रेत्यांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यानंतर आता तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा वडापाव आणि समोसा विक्रेत्यांकडे वळवला आहे. (Maharashtra Latest news)

वर्तमानपत्रात -खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या (एफडीए) रडारवर आले आहेत. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विकू नका, अशी सक्त ताकीद अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागामार्फत सर्व विक्रेत्यांना जारी केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करीत असताना अनेक ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून खाद्यपदार्थ खासकरून वडापाव-भजीपाव दिले जात असल्याचे तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. वास्तविक वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास पूर्वीपासून बंदी आहे.

वर्तमानपत्रांच्या छपाईच्या शाईमधील शिसे, झिंक, कॅडमियन मानवी आरोग्यास घातक असल्याने वडापावसारखे पदार्थ वर्तमानपत्रात बांधून देऊ नयेत, अशा मागणीच्या ठरावाची सूचना शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक आशीष चेंबूरकर यांनी पालिकेच्या महासभेत मांडली होती. ती मंजूरही झाली होती.

Food Stall packing: विक्रेत्यांकडून बटर पेपरचा वापर

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकण्यास बंदी केल्यामुळे आता खाद्यपदार्थ खासकरून वडापाव, भजीपाव, समोसे, सॅण्डवीच यांच्यासारखे अन्य खाद्यपदार्थ बांधण्यासाठी अलीकडच्या काळात बटर पेपरचा वापर होतो. हे खाद्यपदार्थ बटर पेपरमध्ये ठेवून मग वर्तमानपत्रात बांधले जातात. हल्ली अनेक ठिकाणी रस्त्यांवरच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर आणि हॉटेलमध्येही इडली, मेदूवडा, मसाला डोसा असे खाद्यपदार्थ सिल्व्हर फॉईल किंवा बटर पेपरमध्ये बांधून दिले जातात.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

PM Kisan Yojana: गुडन्यूज! पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच खात्यात, लक्षात ठेवा ही तारीख… पीएम मोदींच्या हस्ते होणार वितरण

महाराष्ट्रात एक असं गाव जिथे पडतो सोन्याचा पाऊस, तुम्हाला या ‘गोल्डन व्हिलेज’ची कहाणी माहिती आहे का?

90 किमी ताशी वेगाने वारे धडकणार, 17 राज्यात इशारा, महाराष्ट्रात मॉन्सून दाखल, थेट इशारा..

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम, थेट भाजपाला धक्का

Raj Thackrey : मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुकांच्या पलीकडे जाऊन… राज ठाकरे यांचे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आवाहन काय? पोस्ट चर्चेत

IMD Monsoon Update : गुड न्यूज! आता वेटिंग नाहीच, अलर्ट आलाच… कधीही दणादण कोसळणार, मान्सूनची मोठी अपडेट लगेच करा चेक