टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगलीत शरद पवार गटाची ‘डबल’ खेळी! विधान परिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार अर्ज भरणार; नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून दोन उमेदवार अर्ज भरणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

Vidhan Parishad Election 2026: राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आपले जागावाटप निश्चित केले आहे. आज, सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांकडून वेगाने उमेदवार जाहीर केले जात आहेत. यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून (Satara-Sangli Vidhan Parishad Election 2026) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra Pawar) दोन उमेदवार अर्ज भरणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. पक्षाकडून अभय जगताप (Abhay Jagtap) आणि बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) हे दोन्ही नेते आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Vidhan Parishad Election 2026: दोन उमेदवारांचे अर्ज भरण्यामागचे मुख्य कारण

शरद पवार गटाकडून अचानक दोन उमेदवारांचे अर्ज भरण्यामागे एक मोठे कारण समोर आले आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार अभय जगताप यांच्या खांद्यावर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया (Surgery) झाली आहे. त्यामुळे ते सध्या रुग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत. या शारीरिक परिस्थितीमुळे प्रत्यक्ष निवडणूक लढवायची की नाही, याबाबत स्वतः अभय जगताप यांच्या मनात कमालीचा संभ्रम आहे. या अनपेक्षित वैद्यकीय परिस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सध्या दोघांचे अर्ज भरून घेत आहे. जर ऐनवेळी जगताप यांनी माघार घेतली, तर पक्षाची अडचण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून, नंतर परिस्थितीनुसार एक उमेदवारी अर्ज मागे घेतला जाऊ शकतो.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

ऑल पिक्चर क्लिअर… कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना

Mahayuti Candidate List : महायुतीचं टेन्शन वाढलं, तब्बल 8 जागांवर बंडखोरीचा धोका; कुठं कुठं कोणाचा अर्ज?

Shivsena Candidate List : एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेस आणि पवार गटाचे उमेदवारही ठरले, कुणाला लागली लॉटरी; टफ फाईट होणार; सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर यांना उमेदवारी जाहीर

Vidhan Parishad Election 2026: रात्री दीड वाजता बैठकीत विक्रम काकडेंचं नाव पक्कं झाल्याची चर्चा, पण सकाळ उजाडली तरी एबी फॉर्मच मिळाला नाही, पुणे विधानपरिषदेच्या जागेचा सस्पेन्स पुन्हा वाढला

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर, या 11 जणांना संधी; सोलापूर मधून श्री राजेंद्र राऊत