कॉकरोच जनता पक्षाला अत्यंत मोठा दणका बसलाय. कोर्टाकडून पक्षाला अजिबातच दिलासा मिळाला नाही. यामुळे कॉकरोच जनता पक्षाच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कोर्टाने अत्यंत मोठा दणका दिला आहे.

कॉकरोच जनता पक्ष गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मात्र, कॉकरोच जनता पक्षाला एका मागून एक मोठे दणके बसताना दिसत आहेत. आता थेट दिल्ली उच्च न्यायालयाकडून कॉकरोच जनता पक्षाला (सीजेपी) मोठा धक्का बसला आहे. कॉकरोच जनता पक्षाच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर बॅन करण्यात आले. शुक्रवारी न्यायालयाने अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पक्षाची सोशल मीडिया खाती तात्काळ पूर्ववत करण्याचे आदेश देण्यास नकार दिला. याबाबतची याचिका कोर्टात अभिजीत दीपकेने दिली होती. मात्र, कोर्टाकडून थेट दणका देण्यात आला. कॉकरोच जनता पक्षाचे सोशल मीडिया खाते तात्काळ पूर्ववत होणार नाहीत. कॉकरोच जनता पक्षाचे सोशल मीडिया खाती बॅन करण्यात आली. काही तासातच कॉकरोच जनता पक्षाची सोशल मीडियावर हवा बघायला मिळाली. काही तासातच सोशल मीडियावर त्यांचे फॉलोवर्स वाढत होते. मात्र, त्यात अधिक संख्या ही पाकिस्तानी लोकांची होती. कॉकरोच जनता पक्षाचे एक्सचे अकाऊंट तात्काळ पूर्ववत होणार नाही, असे कोर्टाने म्हटले.
पाकिस्तानातून या पार्टीला सपोर्ट मिळत होता. वेगाने यांचे फॉलोवर्स वाढत होते. त्यानंतर सोशल मीडियावरून कॉकरोच जनता पक्षाचे अकाऊंट बॅन झाले. त्यामध्येच अभिजीत दीपके यांनी या मुद्द्यात कोर्टात धाव घेतली. मात्र, कोर्टाकडून त्यांना दिलासा मिळूच शकला नाही. कॉकरोच जनता पक्ष काहीतरी क्रांती करेल, असे लोकांना वाटत होते. मात्र, आता त्यांच्या अडचणीत वाढ झाली.

अवघ्या 5 दिवसांत या पार्टीने इन्स्टाग्रामवर 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करून इतिहास रचला होता. देशातील काही प्रस्तापित पक्षांना त्यांनी फॉलोवर्सच्या रेसमध्ये मागे टाकले होते. एका विधानावरून सुरू झालेली ही चळवळ सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत होती. अनेकांना कॉकरोच जनता पार्टी नाव वाचून देशात नवा पक्ष आला की काय? असा प्रश्न पडला आहे.
कॉकरोच जनता पक्षाची सोशल मीडियावर नक्कीच क्रेझ बघायला मिळाली. मात्र, काही दिवसातच हवा निघाल्याचे बघायला मिळत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे आता भविष्यात नक्की काय होणार यावरून विविध चर्चा या रंगताना दिसत आहे. आता पुढे अभिजीत दीपके नक्की काय निर्णय घेतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा
Gold Price Today : आजही सोन्याची पडझड सुरूच, सराफा बाजारात मोठी घडामोड, 10 ग्रॅम सोनं आज..
पुण्यात मृत्यूचे तांडव… मुख्यमंत्री ॲक्शन मोडवर, पोलिसांना थेट आदेश, म्हणाले, हयगय करू नका, कठोर…














