टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या

साताऱ्यात चक्क फेब्रुवारी महिन्यापासून हे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा संशय असून, त्याची तयारी जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती.

सातारा : गेल्या काही वर्षात डिजिटल अरेस्टच्या (Digital arrest) नावाखाली वयोवृद्ध, पेन्शनधारक किंवा डिजिटल ज्ञानाचा अभाव असलेल्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत. त्यातच, आता सातारा पोलिसांनी (Satara) मोठी कारवाई करत सायबर गुन्हेगारीतील आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. साताऱ्यातील कोरेगावमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने सायबर क्राईम रॅकेटचा पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे. अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अटक” दाखवून भीती निर्माण करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा हा प्रकार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणात तब्बल 21 युवक-युवती आणि 4 महिलांचा सहभाग असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.

साताऱ्यात चक्क फेब्रुवारी महिन्यापासून हे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा संशय असून, त्याची तयारी जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. सागर सूर्यवंशी हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पोलिसांनी छापा टाकताच, पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामध्ये 35 लाख रुपये रोख रकमेशिवाय मोबाईल आणि लॅपटॉप देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. या कॉल सेंटरमधून दर महिन्याला अंदाजे 20 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.

विशेष म्हणजे आरोपींनी अमेरिकन नागरिकांनाही गंडा घातला असून अमेरिकन नागरिकांचे मोबाईल नंबर आरोपींकडे कसे पोहोचत होते, याचा आता सायबर पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. त्यानुसार, आत्तापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली असून किती रुपयांची आर्थिक उलाढाल आणि फसवणूक झाल्याचं पोलीस तपासातून पुढे येईल, असे सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी म्हटले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Mount Everest: एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत

कोणत्याही क्षणी होऊ शकतो इराणवर मोठा हल्ला, डोनाल्ड ट्रम्प यांचा धक्कादायक निर्णय..

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून महायुतीमध्ये पेच? शिवसेना 7 जागांवर ठाम, आता भाजपच्या भूमिकेकडं लक्ष

Job Vacancy : रेल्वेत नोकरी हवी? ही सुवर्णसंधी सोडू नका ! 6 हजारांहून अधिक पदं भरणार, महाराष्ट्रात किती संधी? जाणून घ्या A to Z माहिती

मोठा हाहाकार! रशियाकडून थेट चीनच्या जहाजावर मोठा हल्ला, जगात खळबळ, भारताने..

लाडक्या बहिणींना आणखी एक संधी, ई-केवायसी करायला आता…लगेच घ्या फायदा, संधी हुकल्यास होईल पश्चात्ताप!