टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळला… रस्त्याला नदीचे रूप, राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं

Maharashtra Unseasonal Rain : आजही राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वसामान्यांची फजिती उडाली. पावसासह वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली.

वादळी वाऱ्यासह धो-धो कोसळला... रस्त्याला नदीचे रूप, राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं

राज्यातील काही भागात गेल्या काही काळापासून अवकाळी पाऊस हजेरी लावताना पहायला मिळत आहे. आजही राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळला. या पावसामुळे सर्वसामान्यांची फजिती उडाली. पावसासह वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागात झाडे उन्मळून पडली. त्यामुळे काही भागात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. आज रत्नागिरी, रायगड आणि सातारा जिल्ह्यातील काही भागाला पावसाने झोडपून काढलं. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रत्नागिरीत कोसळधार

आज रत्नागिरीमध्ये सायंकाळच्या दरम्यान धुळीचे वादळ पहायला मिळाले, त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या धारा कोसळल्या, त्यामुळे नागगिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरीत हवामान विभागाकडून अवकाळीचा इशारा देण्यात आला होता. आता या पावसामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.

रायगडच्या नागोठाणे भागात मुसळधार पाऊस

रायगड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून नागोठणे परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नागोठणे रेल्वे स्थानक परिसरात पार्किंग करून ठेवलेल्या अनेक दुचाकींवर अचानक एक मोठे झाड कोसळल्याने दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दररोज कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिक आपल्या दुचाकी रेल्वे स्थानकाजवळ पार्क करून प्रवास करतात. मात्र अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे पार्किंग परिसरातील झाड उन्मळून थेट दुचाकींवर कोसळले. या घटनेत अनेक दुचाकींचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

नागोठणे येथे बाजारपेठेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अचानक मोठे झाड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शृंगार तळा ते जोगेश्वरी मंदिर परिसराला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे हा मार्ग रहदारीसाठी बंद झाला आहे. तळा गावामध्ये पाऊस, वादळी वारे आणि गारपीटीने धुमाकूळ घातला असून जोगावाडी, बाजारपेठ परिसरासह अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. तसेच राधाकृष्ण मंदिर येथील पत्र्याची शेड जोरदार वाऱ्यामुळे उडून गेली आहे. गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे बेंगलोर महामार्गाला नदीचे स्वरूप

पुणे बेंगलोर महामार्गाला कराड तालुक्यातील उंब्रज जवळ नदीचे स्वरूप आल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. साताऱ्यातील कराड व पाटण तालुक्याला आज पुन्हा अवकाळी पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळाले . या महामार्गावरील वाहनधारक जीव मुठीत घेऊन प्रवास करात असताना दिसत आहे . लहान वाहने अर्धी पाण्यात बुडत होते. दुपारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर पाच किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड-उंब्रज-कासेगाव या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे व ठेकेदाराच्या चुकीच्या कामाचा प्रत्यय आजच्या पावसाने आला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

क्षणभर काळीजच हललं… एकमेकांना वाचवताना एकाच कुटुंबातील चौघे चिटकले, शॉक लागून मृत्यू; राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी