दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
तामिळनाडूत विजय यांचा शपथविधी टळू शकतो: सरकार स्थापनेसाठी 118 MLA हवे TVK कडे 113; बंगालमध्ये 9 मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी
भाषा संचालनालयाची 28 जूनची परीक्षा रद्द: मंत्री उदय सामंत यांची माहिती; राजपत्रित अधिकाऱ्यांना हिंदीची करण्यात आली होती सक्ती
रिपोर्ट- इराण युद्ध 48 तासांत संपू शकते: 14 अटींचा करार तयार; अमेरिका इराणी संपत्ती परत करेल, इराण होर्मुझ उघडेल, अणू-कार्यक्रम थांबवेल
सुनेत्रा पवारांचा राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा: विधानसभेवर निवड झाल्याने सोडली खासदारकी; भाजप नेत्यांना भेटण्याची शक्यता
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून हप्ते भरूनही वर्षापासून परतावा मिळेना, बँकांचे हप्ते फेडण्यासाठी मराठा समाजातील तरुण सावकाराच्या दारात
पश्चिम बंगालनंतर भाजपने आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, क्लीन स्वीप मोहीम राबवणार, कार्यकर्त्यांच्या ट्रेनिंगला सुरुवात
केरळमध्ये सत्तास्थापनेसाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू, मुख्यमंत्रिपदासाठी रमेश चेन्निथलांचं नाव आघाडीवर
‘वंदे मातरम’ला मिळाला राष्ट्रगीताच्या बरोबरीचा दर्जा, केंद्रीय कॅबिनेटची प्रस्तावाला मंजुरी, तर ‘वंदे मातरम’चा अपमान केल्यास तीन वर्षांपर्यंतचा कारावास अन् दंडाची तरतूद
शेतऱ्यांसाठी खूशखबर! राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावर कृषी मॉल उभारला जाणार, सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय
नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण: जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा
मंत्रिपद सोडून छगन भुजबळ राज्यसभेत जाणार का?: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर भुजबळांच्या नावाची चर्चा; भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची: बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही राज्यपाल हस्तक्षेप करतील – निकम
एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास खैर नाही: परवाना रद्द होणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा विक्रेत्यांना इशारा
ममता बॅनर्जी हरल्या नाहीत, केंद्राने त्यांना दहशतीने रोखले: संजय राऊत यांचा आरोप; हिंदीला विरोध नाही, पण मराठी राज्याची प्रथम भाषा
रितेशच्या ‘राजा शिवाजी’ने 50 कोटींचा टप्पा पार केला: टॉप-5 मराठी चित्रपटांत समाविष्ट; राज्यात करमुक्त करण्याची मागणी
प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाच्या टीमसोबत अपघात: एका क्रू मेंबरचा मृत्यू, पाच जखमी; चित्रपटाचे चित्रीकरण तात्काळ थांबवले
IPL 2026 प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर, अहमदाबादमध्ये अंतिम सामना: धर्मशाला आणि चंदीगडमध्ये नॉकआउट सामने होतील; अंतिम सामना 31 मे रोजी होईल