टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Buldhana Crime News : डीजेवर नाचताना चुकून धक्का लागला; बाचाबाची अन् वाद, लग्नघराचं शोकसभेत रूपांतर, नेमकं काय घडलं?

On: April 26, 2026 11:05 AM
Follow Us:

Buldhana Crime News : चार ते पाच जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार केल्याचे समोर आले आहे.

बुलढाणा (खामगाव): बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात रात्री क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या (Buldhana Crime News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्न समारंभात डीजे वर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून उफाळलेल्या वादाचे रूपांतर थेट युवाकाच्या हत्येत झालं आहे. यामध्ये चार ते पाच जणांनी एका 23 वर्षीय युवकाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार (Buldhana Crime News) केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे बर्डे प्लॉट भागामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाली असून एकच खळबळ उडाली आहे. शोएब खान अमीन खान, वय 23 वर्ष राहणार बर्डे प्लॉट, खामगाव असे मृतक युवकाचे नाव आहे. बडे प्लॉट भागातील स्मशानभूमीच्या (Buldhana Crime News) जवळ एका लग्न समारंभामध्ये डीजे सुरू असताना युवक नाचत होते.यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असताना त्याचा दुसऱ्या एका युवकाला धक्का लागला, या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आल्याने परिसरातील चार ते पाच जणांनी शोएब खान अमीन खान यांच्यासोबत वाद घातला आणि चार ते पाच जणांनी संगणमत करून  त्याला ठार मारले,घटनेचा तपास खामगाव पोलीस करत आहेत. (Buldhana Crime News)

Buldhana Crime News :  नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक युवकाचे नाव शोएब खान अमीन खान (वय २३ वर्षे, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) असे आहे. बर्डे प्लॉट भागातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात डीजे सुरू असताना परिसरातील तरुण नाचत होते. यावेळी नाचताना शोएब खान याचा धक्का दुसऱ्या एका तरुणाला लागला.

Buldhana Crime News :  धारदार शस्त्राने हल्ला

नाचताना धक्का लागल्याच्या या क्षुल्लक कारणावरून सुरुवातीला बाचाबाची झाली, मात्र या वादाचे रूपांतर थोड्याच वेळात हिंसक संघर्षात झाले. परिसरातील ४ ते ५ जणांनी संगणमत करून शोएब खान याच्यावर धारदार शस्त्र आणि फायटरने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, शोएब खान याचा जागीच मृत्यू झाला. परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे

Buldhana Crime News :  पोलिसांचा मोठा बंदोबस्त

घटनेची माहिती मिळताच खामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे बर्डे प्लॉट परिसरात तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now