टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी ! राजकारणात मोठी खळबळ, विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे… लवकरच मोठा ट्विस्ट!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईत माजी मंत्री बच्चू कडू आणि शिंदे यांच्यात बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मोठी बातमी! राजकारणात मोठी खळबळ, विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ शिंदे... लवकरच मोठा ट्विस्ट!

Bacchu Kadu : राज्यात विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. येत्या 12 मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक होईल. या निवडणुकीसाठी राज्यातील प्रमुख पक्षांकडून योग्य उमेदवारांचा शोध घेतला जात आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनादेखील राजकीय सोईचा आणि भविष्यकालीन राजकारणात फायदेशीर ठरणारा चेहरा शोधत आहे. दरम्यान, एकीकडे या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढलेल्या असतानाच आता दुसरीकडे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे थेट बच्चू कडू यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीतही एकनाथ शिंदे धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे यांच्याकडून माजी मंत्री बच्चू कडू यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट झाल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. परंतु अगोदर कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच याबाबत निर्णय घेणार असल्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

बच्चू कडू आमदारकी स्वीकारणार का?

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू वेगवेगल्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी संपूर्ण शेतकरी कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे केले होते. या आंदोलनामुळे सरकार जेरीस आले होते. सरकारने बच्चू कडू आणि शिष्टमंडळाला बोलवून कर्जमाफीबाबत चर्चा केली होती. त्यानंतर सरकारने जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा केली होती. या आंदोलनादरम्यान त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर टीका केली होती. तसेच भाजपाचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्यावर भावाच्या हत्येचा कट रचल्याचाही नुकताच आरोप केला आहे. या आरोपामुळेही बच्चू कडू राज्यात चर्चेत आले होते.

बच्चू कडू नेमका काय निर्णय घेणार?

दरम्यान, शेतकरी कर्माफीसाठी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करणारे बच्चू कडू सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यातर्फे दिलेल्या विधानपरिषदेच्या ऑफरला स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Rajya Sabha Election 2026: आधी अनिकेत तटकरे अन् आता राजेंद्र जैन यांना उमेदवारी; राष्ट्रवादीतून साईडलाईन झाल्याची चर्चा असलेल्या तटकरे-पटेल जोडीचा वरचष्मा कायम

Maharashtra Rain Konkan: पहिल्याचं पावसात घटप्रभा नदीचं रौद्ररुप; सावंतवाडीमधील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस, PHOTO

मान्सून लांबला… १५ जूनपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी, हवामान खात्याची मोठी माहिती