टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

IMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

On: April 20, 2026 10:45 AM
Follow Us:

Weather Update Maharashtra : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यावर मोठं संकट आल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात गारपिटीचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

IMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून उष्णतेने कहर केला होता. तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. जवळपास जिल्ह्यांमध्ये 40 पार तापमानाची नोंद झाली. आजही अनेक जिल्ह्यांत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला. गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक गेले. त्यामध्येच आता उष्णता वाढत असताना पुन्हा एकदा गारपिटीसह पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. सततच्या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी राजा पुढे पुन्हा एकदा संकट उभं आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रसह कोकण मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिट होणार असल्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वीच कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला होता.

कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत पाऊस होत आहे. राज्यातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. या पावसाचा सर्वांना वैताग आला. सततच्या पावसामुळे नुकसान होत आहे. त्यामध्येच आता मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. इंदापूर तालुक्याच्या कांदलगाव, सरडेवाडी, शहा हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात रात्री पावणे नऊ वाजल्यापासून पाऊस सुरू झाला.  मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळत असल्याने यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अक्कलकोट मध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ आदी गावाना पावसाने झोडपले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now