टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

5 states Assembly Election Result 2026: पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपची मुसंडी, कोणत्या राज्यात कोण जिंकलं?

Assembly Election Result 2026: पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर, भाजपला घवघवीत यश, ममता बॅनर्जींच्या तृणमूलचं बंगालमध्ये पानिपत

Assembly Election Result 2026: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि केरळ या पाचही राज्यांमध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला (BJP) घवघवीत यश मिळाले. तर आसामध्येही भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले. तर केरळमध्ये डाव्यांचा शेवटचा गड पडला असून याठिकाणी काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये विजय थलपति याच्या टीव्हीके पक्षाने मुसंडी मारत द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकले. तर पुद्दुचेरीमध्येही भाजपने यश मिळवले आहे. (Vidhansabha Election Result 2026)

पाच राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या या यशामुळे भाजपची देशभरातील ताकद आणखी वाढली आहे. त्यामुळे आगामी काळात भाजप आणखी आक्रमक राजकारणाचे धोरण अवलंबू शकते. या निकालातून आता विरोधक काय धडा घेणार आणि यापुढे कशाप्रकारची रणनीती आखणार, हे पाहावे लागेल.

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल

भाजप- 190
तृणमूल काँग्रेस- 94
काँग्रेस -2
डावे पक्ष- 2
इतर-2

Tamilnadu Election Result 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल

द्रमुक- 60
अण्णाद्रमुक-65
टीव्हीके-109
इतर-9

Kerla Election Result 2026: केरळ विधानसभा निवडणुकीचा निकाल

काँग्रेस-98
डावी आघाडी -40
इतर-2

Assam Election Result 2026: आसाम विधानसभा निवडणुकीचा निकाल

भाजप-97
काँग्रेस- 24
इतर-5

Puducherry Election Result 2026: पुद्दुचेरी  विधानसभा निवडणुकीचा निकाल

भाजप- 22
काँग्रेस-6
इतर-1

Rahuri Bypoll Election 2026: राहुरी पोटनिवडणुकीचा निकाल

१७ व्या फेरीचा निकाल. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मोठी आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. १७ व्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून, कर्डिले यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर ७० हजारहून अधिक मतांचे वर्चस्व निर्माण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे गोविंद मोकाटे हे दुसऱ्या क्रमांकावर असले, तरी कर्डिले यांच्या मतांच्या तुलनेत ते बरेच पिछाडीवर आहेत. अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे यांनी वंचितच्या उमेदवारापेक्षा अधिक मते घेत तिसरे स्थान राखले आहे.

Baramati byelection Result 2026: बारामती पोटनिवडणुकीत 17 व्या फेरीनंतर ‘वहिनीं’चे एकतर्फी वर्चस्व

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत 17 व्या फेरीअखेर वहिनींनी ऐतिहासिक आघाडी घेतली असून, प्रतिस्पर्ध्यांचे सर्व मनसुबे उधळून लावले आहेत.

17 व्या फेरीची आकडेवारी:

एकूण झालेले मतदन – ९१६१
आ. वहिनींना
झालेले मतदान – ८९६७
इतर मते – १९४

१७ व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार झालेले एकूण मतदान – १,५०,८७६

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now