तुम्हाला AC घ्यायचा असेल तर घाई करू नका. आज आम्ही तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आधी जाणून घ्या की 1 टन AC किंवा 1.5 टन तुमच्या घरासाठी चांगलं ठरेल का? घरासाठी कोणत चांगला आहे? या प्रश्नाचं उत्तर आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण, तापमान वाढले की तुम्हाला पश्चाताप होऊ नये. यासाठी ही माहिती संपूर्ण वाचा.
उन्हाळा सुरू झाला आहे आणि तापमान हळूहळू वाढत असल्याचे आपल्याला जाणवत असेल. तापमान वाढण्याच्या आधीच AC खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा शहाणपणाचा निर्णय आहे. कारण, सध्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा आणि जिओ सेल्स सारख्या सर्व ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर चांगली सूट आहे.
सर्वात आधी AC कोणता आणि कसा खरेदी करायचा, हे ठरवा. विशेषत: जर तुम्ही घरासाठी AC खरेदी करत असाल तर तुमच्या रूमसाठी 1 टन किंवा 1.5 टन कोणता AC खरेदी करायचा हे जाणून घेणं गरजेचं आहे.
AC खरेदी करण्यापूर्वी 1 टन AC घ्यायचा की दीड टनाचा AC घ्यायचा, या संभ्रमात बहुतांश लोक असतात. हा निर्णय केवळ आपल्या खोलीच्या आकारावर अवलंबून नसतो. त्याऐवजी आपण राहत असलेल्या ठिकाणी वातावरणातील ओलावा कमी-जास्त आहे की नाही हेही महत्त्वाचे ठरते.
त्याचबरोबर दुपारी सूर्यप्रकाश थेट खोलीत येतो किंवा सावली असते. त्यामुळे प्रश्न अजूनही तसाच आहे, की दीड टनाचा AC घ्यायचा की एक टनाचा AC पुरेसा आहे? चला जाणून घेऊया.
1 टन AC किंवा 1.5 टन AC, सर्वोत्तम पर्याय कोणता?
हा निर्णय अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. जसे की खोलीचा आकार, हवामान आणि वीज इत्यादी. या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्या रूमसाठी किती वजनाचा AC चांगला असेल हे जाणून घेऊया.
खोलीचा आकार
एअर कंडिशनरची कूलिंग क्षमता टनांमध्ये मोजली जाते आणि ती जागेच्या आकाराशी संबंधित असते. साधारणपणे 120 ते 140 चौरस फुटांपर्यंतच्या खोल्यांसाठी 1 टनाचा AC पुरेसा असतो. तर 150 ते 180 चौरस फुटांच्या खोल्यांसाठी 1.5 टनांचा AC योग्य आहे.
तापमान कसे आहे?
तुम्ही खूप उष्ण किंवा पिच हवामान असलेल्या भागात राहत असाल किंवा आपल्या खोलीत खराब इन्सुलेशन असेल तर 1.5 टन AC खरेदी करणे चांगले.
किती वीज वापरली जाते?
साधारणपणे 1.5 टन AC पेक्षा 1 टनाचा AC कमी वीज वापरतो. मात्र, हे रेटिंगवरही अवलंबून असते. कारण उच्च रेटेड मॉडेल्स क्षमतेची पर्वा न करता चांगली ऊर्जा कार्यक्षमता देतात.
तुम्हाला नेमके काय हवे?
काही लोकांना जलद थंडावा हवा असतो. म्हणूनच आम्ही छोट्या खोल्यांसाठीही अधिक शक्तिशाली AC युनिटला प्राधान्य देतो. जर तुम्हाला रूममध्ये इन्स्टंट कूलिंग आवडत असेल किंवा तुमच्या गरजा अशा असतील की तुम्हाला क्विक कूलिंगची गरज असेल तर 1.5 टनांचा AC अधिक उपयुक्त ठरेल.
महत्वाचे लेख
या उन्हाळ्यात कोरडी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी करा ‘हे’ सर्वोत्तम घरगुती उपाय