टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या…

Follow Us:

Baramati byelection Sunetra Pawar Rally: बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीची सांगता सभा होणार आहे. या सभेला देवेंद्र फडणवीस उपस्थित असतील.

Baramati byelection Sunetra Pawar Rally: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या  निधनानंतर बारामतीत होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासह पवार कुटुंबीयांनी बारामती (Baramati bypoll 2026) पिंजून काढल्यानंतर मंगळवारी याठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडणार आहे.  सभेसाठी मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, सभास्थळी दादांच्या आठवणींना उजाळा देणारे काही भावनिक फोटो लावण्यात आले आहेत. हे फोटो बारामतीकरांच्या भावना जागृत करणारे ठरत असून अनेकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जात आहेत. या माध्यमातून दादांच्या कार्याची आणि त्यांच्या सहवासाची आठवण उपस्थितांना करून दिली जात आहे. (Maharashtra Politics news)

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी मंगळवारी सकाळी सभास्थळी येऊन सर्व गोष्टींची पाहणी केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना म्हटले की, आजच्या सभेला मुख्यमंत्री साहेब, उदय सामंत, रामदास आठवले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते येणार आहेत. दादांच्या आठवणी बारामतीच्या कणाकणात आहेत, तुम्हाला लोकांच्या भावनांतून त्या कळतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. आजच्या सभेला सुप्रियाताई येणार आहेत. याशिवाय पवार कुटुंबातील अनेकजणही येतील. पवार साहेबांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे अजून त्यांचा मला काही निरोप आलेला नाही. पण सुप्रिया ताई नक्की येतील, अशी माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.

अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. अजित पवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी येत असताना त्यांचे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताना कोसळले होते. यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बारामतीत पोटनिवडणूक होत असून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आकाश मोरे यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या शिष्टाईनंतर काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली होती. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. तरीही सुनेत्रा पवार यांच्याविरोधात 22 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा