टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या अंधारे यांची सोलापुरात जाहीर सभा

Follow Us:

महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, आ. भास्कर जाधव, अनिल कोकीळ शिवसेना उपनेते (सोलापूर संपर्कप्रमुख), संजना घाडी (महिला आघाडी संपर्कप्रमुख) यांची १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हुतात्मा स्मृती मंदीर येथे जाहिर सभा होणार आहे. अंधारे यांचे महाप्रबोधन यात्रे अंतर्गत अनेक सडेतोड व प्रभावी भाषणे झाली आहेत. 

त्यांच्या भाषणाला महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातुन प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर जिल्हातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणाऱ्या सभेला सुध्दा प्रचंड प्रतिसाद लाभेल. या सभेला युवा सेना, विद्यार्थी सेना, रिक्षा सेना, महिला आघाडी, वाहतुक सेना, सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, कामगार सेना आणि शिवसेना प्रणित सर्व  संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी केले आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now