टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जामीन स्थगितीची ईडीची मागणी नाकारली, राऊतांची आजच सुटका

On: November 9, 2022 10:25 AM
Follow Us:

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या सुटकेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. संजय राऊतांच्या जामीनावर स्थगिती देण्याची ईडीची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राऊत केव्हाही तुरुंगाबाहेर येऊ शकतील.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली होती. 

तेव्हापासून राऊत तुरुंगात आहेत. अटक केल्यानंतर राऊत यांना सुरुवातीला ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर राऊत यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या अटकेनंतर राऊत आर्थर रोड कारागृहामध्ये होते. या प्रकरणी ईडीने अधिक तपास करत पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप केला होता. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही, असा युक्तीवाद राऊतांचे वकिलांनी केला. 
परंतु, ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने राऊत यांना जामीन मंजूर केला. या जामीनाला ईडीने विरोध केला होता. ईडीने केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावल्याने राऊत यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

“हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं”; डिलिमिटेशनवरून राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

“अदाणींनी मनात आणलं तर सुप्रिया सुळे एका क्षणात मुख्यमंत्री होतील!” लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा; शरद पवारांवरही निशाणा

अजून 7 खासदारांचा हवा पाठिंबा, सरकारने बाहेर काढला हुकमी एक्का, बहुमताचा कसा होणार जुगाड?

NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर ‘त्या’ 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु

Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..

नेहा बोराला पकडताना पोलिसांचा गैरवर्तनाचा आरोप; व्हिडीओ व्हायरल!