हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावल्याने वाद

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

‘बिर्याणी बाय किलो’ या बिर्याणी हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजांचे पोस्टर्स लावण्यात आल्याने वाद झाला. कोल्हापूर शहरातील बिर्याणी हाऊसमध्ये पोस्टर दिसल्यानंतर हॉटेलमध्ये घुसून काही तरुणांनी पोस्टर फाडले. दरम्यान, बहादूर शाह जफर या एका मुघलाचा फोटो लावण्याने वाद निर्माण झाला. कोल्हापूर शहरातील एका हॉटेलमध्ये औरंगजेबाच्या वंशजाचा फोटो लावण्यावरून वाद झाला.

बिर्याणी बाय किलो या हॉटेलमध्ये इंटिरिअर डिझाइन करत असताना हॉटेल मालकाने औरंगजेबाच्या वंशजाचे फोटो लावला. यातून हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये जात हॉटेल मालक आणि कामगार यांना याबाबत जाब विचारले. त्यावेळी हॉटेल मालक आणि कामगारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरुन संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमधील कामगारांना शिवीगाळ करत मारहाण करून औरंगजेबाच्या वंशजाचे फोटो फाडले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon