महाराष्ट्र-कर्नाटकामधील सध्याचा वाद हा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. एकदा नव्हे, दोन-तीनदा त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केली आहेत. आज महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला झाला आहे. त्यानंतरही महाराष्ट्रातील जनता संयम राखून आहे. हा संयम सुटू नये याची काळजी कर्नाटक व केंद्र सरकारनं घ्यायला हवी.
सीमा भागातील वाहनांवरील हल्ले 24 तासात थांबले नाहीत तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल. उद्रेक झाला तर त्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई जबाबदार असतील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुनावलं आहे.
बेळगाव जवळच्या हिरेबागवाडी इथं कर्नाटकातील काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळं सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याच मुद्द्यावर पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.