टीम इंडियाची कामगिरी २०२२ मध्ये खराब राहिली. खास करून मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यातही भारताला अपयश आलं. त्यानंतर झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय संघ इंग्लंडकडून १० विकेट्सनं पराभूत होऊन स्पर्धेबाहेर फेकला गेला. एकदिवसीय सामन्यांतही बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका गमवावी लागली.
त्यामुळंच बीसीसीआयनं नेतृत्व बदलाचा निर्णय घेतल्याचं समजतं. टी-२० बरोबरच एकदिवसीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पंड्याकडं सोपवण्याचा विचार सुरू आहे. तसं झाल्यास रोहितकडं केवळ कसोटी संघाचं कर्णधारपद राहणार आहे.पुढील वर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेपर्यंत रोहितच एकदिवसीय संघाचं नेतृत्व करेल, असं मानलं जात होतं. मात्र, बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर सगळी गणितं बदलली आहेत.