दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समंथा प्रभू ही कायम चर्चेत असते. कधी तिच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. सध्या समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा समंथाला ‘मायोसिटिस’ या ऑटोइम्युन आजाराचे निदान झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. ती सध्या परदेशात उपचार घेत आहे. तिच्याविषयी अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. समंथाने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
मी माझ्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे काही दिवस चांगले आणि काही वाईट असतात. कधी कधी एक पाऊल टाकणेही शक्य नसल्याचे मला जाणवते. पण जेव्हा मी मागे वळून पाहते, तेव्हा मला वाटते की, मी खूप मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचले आहे. मी इथे लढायला आले आहे. मला आणखी एक गोष्ट स्पष्ट करायची आहे.
मी पाहिले आहे की, अनेकजण माझा आजार गंभीर आणि जीवघेणा असल्याचे म्हटले जात आहे. पण मी ज्या परिस्थितीत आहे ती जीवघेणी नाही. या आजारामुळे सध्या तरी माझ्या जीवाला धोका नाही. मी मेली नाही, त्यामुळे अशा अफवा पसरवू नका, असे समंथा म्हणाली.
सम्बंधित ख़बरें

हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! ‘कांतारा’च्या निर्मात्यांनी केले स्वागत; KGF 3 मध्ये व्हिलन साकारणार?

कर्नाटक : पोलिसांनी थांबवले ‘छावा’चे प्रदर्शन

Chhaava First Weekend Collection: बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चं तुफान; 72 तासांत 10 फिल्म्सचे रेकॉर्ड्स चक्काचूर

‘छावा’चा महाराष्ट्रात बोलबाला, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये छापले कोट्यवधी
वेड चित्रपटाने मोडला ‘सैराटचा’ रेकॉर्ड