Sunday, September 8, 2024
Homesolapurमाजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नीच्या नावे काढले 45 कोटी रुपयाचे कर्ज

माजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नीच्या नावे काढले 45 कोटी रुपयाचे कर्ज

सोलापूर हिरज तालुका उत्तर सोलापूर येथील गट नंबर 230/ 2 मधील 15 एकर 28 गुंठे शेत जमीन तिघांनी बनावट कागदपत्र तयार करून तोतया व्यक्ती उभा करून हडप केली. त्यानुसार विजय तुकाराम खडतरे सहाय्यक दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर दोन यांनी सरकारतर्फे सदर बाजार पोलीसात तक्रार दिली एका व्यक्तीने मुकुंदराज चंद्रकांत गायकवाड असल्याची भासवून ती जमीन रमेश कुमार बन्सीलाल राहणार पुणे रोड यांना विकली. 2002 पासून मुकुंदराज गायकवाड हे स्वतःची जमीन परत मिळावी म्हणून पाठपुरावा करत होते परंतु त्यांना कुठलीही दाद मिळत नव्हती.  2002 साली बोगस मुकुंदराज गायकवाड यांनी रमेश कुमार बन्सीलाल व्यास यांनाही जमीन विकली. त्यानंतर रमेश कुमार बन्सीलाल व्यास यांनी ही जमीन अनिल जाधव यांना विकली. अनिल जाधव यांनी ही जमीन लोनावत  यांना विकली. लोनावत यांनी ही जमीन माजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नीना विकली. गेल्या वीस वर्षापासून मुकुंदराज गायकवाड ही व्यक्ती न्यायासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे. तरी त्या व्यक्तीची दखल घेतली गेली नाही. सामाजिक कार्यकर्ते जयराज नागणसूरे व एडवोकेट सौरव साळुंखे यांनी याची दखल घेत 2020 साली सर्व पुराव्यानुसार तक्रार दाखल केली व त्यांच्या पाठपुराव्याला आज यश मिळाले. त्यावरून महबूब इब्राहिम सय्यद राहणार बुधवार पेठ पठाण चाळ व गंगाधर नामदेव शेंडेकर राहणार वडदेगाव तालुका मोहोळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
2012 मध्ये 1695/2012 हा दावा दाखल केला,कोर्टात दावा चालू असताना माजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नी जयश्री दिलीप माने यांनी हीच शेत जमीन दिनांक 29 /8/ 2012 रोजी खरेदी केली दिनांक 19/12/2019 ला प्रदूषण नियंत्रण मंडळांनी याच गटात खडी मिक्सिंग प्लांट टाकण्यास परवानगी नाकारली. असतानाही माजी आमदार दिलीप माने यांनी डिझेल व खडी मिक्सिंग प्लॅन्ट बेकायदेशीर चालू केले. तोतया इसम उभा करून बोगस खरेदीखत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेली मोजे हिरज तालुका उत्तर सोलापूर गट नंबर 230 /2 ही शेतजमीन सध्या माजी आमदार दिलीप माने यांच्या पत्नी जयश्री दिलीप माने यांच्या नावे आहे.  सहा हेक्टर 28 गुंठे जमीन  म्हणजे एकूण 15 एकर 28 गुंठे जमीनीवर  पंजाब नॅशनल बँक कस्तुरबा मार्केट शाखे ने तब्बल 45 कोटीची कर्ज दिले आहे तसा बोजा सातबारावर नोंद आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments