Sunday, October 6, 2024
Homesportsब्रेकिंग! मिशन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

ब्रेकिंग! मिशन वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

टीम इंडियाने आज टी20 वर्ल्डकपमधील दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना नेदरलँड्सला 56 धावांनी हरवले. भारताने नेदरलँड्ला विजयासाठी 180 धावांचे आव्हान ठेवले होते.
मात्र नेदरलँड्सच्या संघाला 9 बाद 123 धावा करता आल्या. भारताने या सामन्यात फलंदाजी तसेच गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर जबरदस्त कामगिरी केली. विराट कोहलीने वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजयी खेळी केली होती.
तर आज विराटने नेदरलँड्सविरुद्ध जोरदार हल्लाबोल केला आणि सलग दुसरे अर्धशतक ठोकले. कोहलीने 44 बॉलमध्ये नाबाद 62 धावांची खेळी केली.
यात 2 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. दरम्यान सूर्यकुमार यादवह त्याने तिसऱ्या विकेटसाठी 48 बॉलमध्ये 95 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 25 बॉलमध्ये नाबाद 51 धावांची खेळी केली.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments