प्रभासच्या चाहत्यांचा जल्लोषात कांड, थिएटरमध्ये फटाके फोडताच…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सुपरस्टार अभिनेता म्हणून प्रभास सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या आगामी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. २३ ऑक्टोबर रोजी प्रभासचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. आंध्र प्रदेशमध्ये प्रभासचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या ‘बिल्ला’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. याला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. पण थिएटरमध्ये फटाके वाजवल्यामुळे असे काही झाले की सर्वांना तेथून पळावे लागले.
ताडेपल्लीगुडेम शहरातील एका थिएटरमध्ये बिल्ला चित्रपटाच्या शोचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपट सुरु असताना प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडण्यास सुरुवात केली. पण फटाके फोडल्यामुळे थिएटरमधील सीट्सला आग लागली. ही आग इतकी पसरली की, प्रेक्षकांना थिएटर बाहेर काढावे लागले. थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी कशीबशी आग नियंत्रणात आणली. दरम्यान, कुणालाही दुखापत झालेली नाही.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon