राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने काल ही घोषणा केली आहे.
पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी 12 फेब्रुवारी 2023 रोजी एकाच दिवशी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्या या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात ही झाली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ही परीक्षा घेण्यात येईल. 15 डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येईल. विलंब शुल्कासह 13 डिसेंबर तर अति विलंब शुल्कासह 31 डिसेंबर पर्यंत अर्ज भरता येईल. विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.