- टी 20 विश्वचषकमध्ये भारतीय संघाचा रोहित शर्मा कर्णधार म्हणून शानदार कामगिरी करत आहे. रोहित भारतीय संघाला या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यापर्यंत घेऊन गेला आहे. रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात या स्पर्धेच्या सुपर 12 फेरीतील शेवटचा सामना पार पडला. हा सामना भारताच्या पारड्यात पडला.
या विजयासह भारताने उपांत्य सामन्यात धडक तर दिलीच, पण त्याचसोबत कर्णधार रोहितच्याही नावावर खास विक्रमाची नोंद झाली. रोहित याने झिम्बाब्वेविरुद्धचा सामना 71 धावांनी आपल्या खिशात घातला. या विजयासह त्याने भारतीयांची छाती गर्वाने फुगवली.
रोहितने हा सामना जिंकताच, तो एका आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटच्या इतिहासात एका कॅलेंडर वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडून बनला. झिम्बाब्वेविरुद्धच्या हा 2022मधील 21वा आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधील विजय होता.