दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी आली आहे. टपाल विभागातील एकूण 23 सर्कलमध्ये 98,000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टि-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98,083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख थोड्याच दिवसात जाहीर करण्यात येईल. एकूण पदे : 98083, पोस्टमन : 59099, मेलगार्ड : 1445, मल्टि-टास्किंग (MTS) : 37539.