Saturday, September 21, 2024
Hometop newsउद्धव ठाकरे पडले तोंडघशी; वीज बिलावरुन फडणवीसांनी पुरावाच सादर केला

उद्धव ठाकरे पडले तोंडघशी; वीज बिलावरुन फडणवीसांनी पुरावाच सादर केला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वीज बिलावरून कलगीतुरा रंगला आहे. भरसभेत  फडणवीसयांचा जुना व्हिडिओ प्ले करून उद्धव यांनी फडणवीसांवर जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळगा, असा टोला लगावला होता. सत्तेत नसताना आणि सत्तेत आल्यानंतर फडणवीसांच्या भूमिकेवर ठाकरेंनी बुलढाण्यातील सभेत टीका केली होती.
उद्धव यांच्या या टीकेला फडणवीस यांनी एक व्हिडिओ ट्विट करून प्रत्यूत्तर दिले आहे. काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, असा टोला फडणवीस यांनी उद्धव यांना लगावला आहे. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी थकीत वीजबिलाबाबत फडणवीसांनी विरोधी पक्षनेते असताने जे विधान केले होते, ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे.
ठाकरे मुख्यमंत्री असताना फडणवीस विजबिल वसुलीविरोधात सरकारविरोधात बोलत होते. त्यावेळी मध्य प्रदेश सरकारचा दाखला देत होते. मध्य प्रदेश सरकारने साडे सहा हजार कोटी रुपये देऊन बिले भरली, महाराष्ट्र सरकार सावकारी पद्धतीने विजबिल वसुली करत आहे असं म्हणत होते.
आता करून दाखवा, अशी टीका ठाकरे यांनी फडणवीसांवर केली. यावर फडणवीसांनी ठाकरेंचे मुख्यमंत्री असतानाचा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईवर बोलतानाचा आणि आता सत्ता गेल्यानंतर बोलतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
यावरून त्यांनी काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…! २०१९ ते २०२२ या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवला, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
फडणवीस यांनी आणखी एक ट्विट करत महावितरणला वीजबिल वसुली थांबविण्याचा आदेश दिल्याचे पत्र पोस्ट केलेआहे. यामध्ये कृषी बिलाच्या वसुलीसाठी चालू एका बिलाचा भरणा करून घ्यावा, जास्तीच्या थकबाकी वसुलीसाठी सक्ती करू नये असा आदेशत्यात आहे. यावर जे बोलतो ते करतो,  फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश २२ नोव्हेंबर २०२२ रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे!, असे म्हटले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments