आशीर्वाद तुझा एकवीरा आई

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

सोनी मराठी वाहिनीवर एकवीरा आईचा महिमा दाखवणारी ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे.

आगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. या पत्रकार परिषदेस एकवीरा आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मयूरी वाघ, अभिनेत्री अमृता पवार, मालिकेचे निर्माते दिग्पाल लांजेकर, लेखक आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, सोनी मराठी फ़िकशन हेड – सोहा कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ या मालिकेत विविध व्यक्तिरेखा साकारलेली अभिनेत्री अमृता पवार ही प्रमुख भूमिकेत असणार आहे. तर अभिनेत्री मयूरी वाघ ही यामध्ये एकवीरा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.आशीर्वाद तुझा एकवीरा आई २८ नोव्हेंबर पासून,सोम-शनि, रात्री ८ वाजता सोनी मराठीवर प्रसारित झाली आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon