Sunday, September 8, 2024
Homepolitical...अन् भुजबळांनी सभागृहात मफलर पुढे करून भीक मागितली

…अन् भुजबळांनी सभागृहात मफलर पुढे करून भीक मागितली

सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने संघर्ष होताना दिसत आहे. आज सभागृहात नवे नाट्य घडले. काही दिवसापूर्वीच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान काढले होते. चंद्रकांतदादा पाटील यांच्या भीक मागण्याच्या विधानाचे पडसाद आज हिवाळी अधिवेशनात उमटले.

या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ हे आक्रमक झाले होते. चर्चेदरम्यान त्यांनी चक्क गळ्यातील मफलर काढून भीक मागण्याची एक्टिंग केली. राज्यातील शाळांसाठी भीक मागण्याची परवानगी आहे का, असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला. भुजबळ यांच्या या गुगलीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच उत्तर दिले.
प्रबोधनकार ठाकरे यांनी माझी जीवन गाथा नावाचे पुस्तक त्याकाळी लिहिले आहे.आमच्या सोबत भीक मागायला कोण येणार, असे त्यांनी ग्रामस्थांना विचारले होते. कोणत्याही कार्यासाठी फंड गोळा करणे म्हणजे भीकच आहे, अशी भूमिका प्रबोधनकार ठाकरे यांची होती. इतकेच नव्हे तर फडणवीस यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा संपूर्ण उताराच सभागृहात वाचून दाखवला. फडणवीस यांच्या या भूमिकेमुळे  छगन भुजबळ निरुत्तर झाले. 
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments