मा.आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी तरुणांची फळी बळकट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजत असून सांगोला नगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना लवकरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या अनुषंगाने निष्ठावंत तरुणांना निवडणूक लढविण्याची संधी द्यावी अशी मागणी युवा सेनेचे तालुका उपाध्यक्ष यश नलवडे यांनी केली आहे.
यावेळी बोलताना नलवडे म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षातील मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाणारे आमचे नेते माजी आमदार अँड शहाजीबापू पाटील यांच्या राजकीय वाटचालीमध्ये आमचे युवा सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक उर्फ गुंडादादा खटकाळे यांच्या माध्यमातून युवकांची सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज उभारली आहे.
अशावेळी जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांचे गणित जुळवत असताना जास्तीत जास्त तरुण उमेदवार द्यावेत अशी मागणी महायुतीतील पक्षश्रेष्ठीकडे करणार असल्याचे यावेळी यश नलवडे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या




