टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दिला थेट धक्का, होर्मुजबद्दल हादरवणारे विधान, जिंकण्यापूर्वी..

इराण आणि अमेरिका युद्धाचा भडका उडाला. मोठी हल्ले केली जात आहेत. यादरम्यानच अमेरिकेने इराणला 48 तासाचा वेळ दिला. यादरम्यान जर इराणने करार केला नाही तर त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी आता होर्मुज खाडीबद्दल मोठे विधान केले.

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दिला थेट धक्का, होर्मुजबद्दल हादरवणारे विधान, जिंकण्यापूर्वी..

इराण आणि अमेरिका युद्ध पेटले आहे. या युद्धात इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांची वाट लागली. गॅस पुरवठा आणि कच्चे तेल पुरवठा खंडीत झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुज खाडी खुली करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आली. मात्र, होर्मुज खाडी खुली करण्यात अमेरिकेला यश मिळत नाही. होर्मुज खाडी खुली करण्यासाठी अमेरिकेने इराणला 48 तासाचा वेळ दिला. मात्र, इराण काही मागे हटण्याचे नाव घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, आमचा विजय झाला आहे. इराण हारला आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेसमध्ये बोलताना त्यांनी म्हटले की, आम्ही विजेते आहोत, शुल्क लावण्याचा अधिकार आमच्याजवळ आहे.

होर्मुज खाडीतून जगातील 20 टक्के तेलाची निर्यात आयात होते. म्हणजेच जर कदाचित इराणविरोधातील युद्ध अमेरिका जिंकली तर होर्मुज खाडीत अमेरिका शुल्क लादू शकते. अजून इराण विरोधातील युद्धात अमेरिका जिंकली नाही पण अगोदरच होर्मुज खाडीत शुल्क लावण्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भाष्य केले जात आहे. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, जर इराण करार करण्यास तयार झाला आणि करार केले तर इराणचे ऊर्जा प्रकल्प वाचू शकतात.

अथवा नाही. इराणजवळ एकही ब्रिज शिल्लक राहणार नाही आम्ही इराणचे सर्व ब्रिज उडवून टाकू. हेच नाही तर इराणच्या रेल्वेवरही हल्ला करण्याच्या तयारीत इस्त्रायल आहे. त्यांनी तसा इशाराही इराणला दिला आहे. अमेरिका आणि इस्त्रायलकडून सध्याच्या परिस्थितीला इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले जात आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी धमकी दिली असून इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर आणि ब्रिजवर हल्ले केले जाणार असल्याचे म्हटले. इराणला युद्धबंदी करार करण्यासाठी दबाव आणला जात आहे. इराणने युद्धबंदी करार करण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. मात्र, अमेरिकेला त्या अटी मान्य करायच्या नाहीत. इराणसाठी पुढील काही तास अत्यंत घातक आणि धोकादायक असणार हे स्पष्ट आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now