महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार? 8 मंत्र्यांना थेट घरी पाठवणार, नावं समोर; कोणत्या गटाला भूकंपाचा सर्वाधिक धक्का?

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची शक्यता आहे. भाजप, शिंदे गट आणि पवार गटातील काही वादग्रस्त मंत्र्यांना हटवण्याची चर्चा आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सामना वृत्तपत्रात याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्‍यांना लवकरच डच्चू देण्यात येणार असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या ऐवजी काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल, असे बोललं जात आहे. यात भाजपचे दोन, शिंदे गटातील चार आणि पवार गटातील दोन मंत्र्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्वांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणं भोवणार

विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठे यश मिळाले. यानंतर राज्यात महायुतीचे सरकारही स्थापन झाले. पण हे सरकार स्थापन झाल्यापासून महायुतीचे काही मंत्री आणि आमदार सातत्याने वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तन करत आहेत. त्यामुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमातही काही मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे. हीच बाब लक्षात घेता, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. इतर पक्षातील काही दिग्गजांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

कोणत्या गटातील किती मंत्री?

शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश असल्याचे बोललं जात आहे. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा झाला आहे. त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले आहे. गिरीश महाजन यांनाही पक्षाच्या गरजेनुसार मंत्रिमंडळाबाहेर राहण्यास सांगितले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या फेरबदलात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी भाजपमध्ये सध्या नाराज असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon