Ind vs Aus Rohit Sharma Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत.
Ind vs Aus Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India vs Australia) आहे. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका सुरु असून या मालिकेतील दोन सामने खेळवण्यात आले. या दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव पत्कारावा लागला. ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी आघाडीत घेत मालिकाही खिशात घातली आहे.
दरम्यान, अनेक महिन्यांनंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतासाठी एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना शिल्लक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा मैदानात कधी दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली, जवळजवळ टीम इंडियासाठी खेळत आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडियाची पुढील एकदिवसीय मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल.

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार- (India vs Australia)
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा एकदिवसीय मालिकेत अजून एक सामना शिल्लक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना शनिवार, 25 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर, टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका देखील खेळणार आहे, जी 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. या मालिकेनंतर, दक्षिण आफ्रिका भारताचा दौरा करेल. या मालिकेत दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने असतील.
संबंधित बातम्या
भारत अन् दक्षिण अफ्रिकेत रंगणार मालिका- (Ind vs SA)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरू होईल. पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा 3 डिसेंबर रोजी आणि तिसरा 6 डिसेंबर रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तथापि, भारताची घरच्या मैदानावर ही मालिका असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळण्याची अपेक्षा आहे.



