टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा मोठा हल्ला, पूर्ण देश भीतीत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी थेट..

On: June 1, 2026 10:29 AM
Follow Us:

इराण आणि अमेरिका युद्धात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मोठे हल्ले सुरू झाली आहेत. कोणत्याही देशाच्या मध्यस्थीला यश मिळत नाहीये. आखाती देशांपुढे मोठे संकट आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा मोठा हल्ला झालाय.

जगाला ज्याची भीती तेच घडले, इराणचा मोठा हल्ला, पूर्ण देश भीतीत, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध एकदाचे थांबावे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, युद्ध थांबणे दूरच पण परिस्थिती अधिक चिघळत आहे. अमेरिकेकडून सातत्याने सांगितले जात आहे की, इराण आणि अमेरिका युद्धविरामाच्या अत्यंत जवळ आहे. मात्र, घोषणा काही होत नाही. युद्धविरामाच्या घोषणेची प्रतिक्षा जग करत आहे. यादरम्यानच आता खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. सोमवारी सकाळी सकाळी कुवेतवर मोठा हल्ला करण्यात आला. मिसाईल आणि ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर पूर्ण कुवेतमध्ये सायरन वाजले. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा हल्ला इराणकडून करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सायरन वाजल्यानंतर लोक सुरक्षित स्थळी गेले. कुवेतच्या न्यूज एजन्सीच्या म्हणण्यांनुसार, त्यांच्या पूर्ण देशात सायरन वाजले. त्यानंतर लष्कराकडून तात्काळ डिफेंस सिस्टम अॅक्टिव करण्यात आली.

ज्यामुळे मिसाईल आणि ड्रोन हल्ले हवेतच रोखण्यात आली. दुसरीकडे इराणकडून जागतिक जलक्षेत्रात अमेरिकेचे ड्रोन MQ-1ला मारून पाडले आहे. इस्त्रायलने लेबनानमध्ये मोठी कारवाई सुरू केलीये. मोठे हल्ले केले जात आहेत. दुसरीकडे अमेरिकेचे विदेश मंत्री मार्काे रूबियो यांनी इस्त्रायल आणि लेबनानच्या नेत्यांसोबत चर्चा केली. अमेरिकेने प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर इस्त्रायलकडून मोठे हल्ले केले जात आहेत.

मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. कुवेतमध्ये इराणकडून हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जातंय. मात्र, यावर अजून इराणकडून कोणतेही भाष्य करण्यात आले नाही. पुन्हा एकदा परिस्थिती तणावात आहेत. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या युद्धात आखाती देशांमध्ये हल्ले होत आहेत. होर्मुज खाडीतही मोठ तणाव आहे.

कुवेतवर हल्ल्याला सुरूवात झाल्यानंतर सायरन वाजण्यास सुरूवात झाली. लोक घर सोडून सुरक्षितस्थळी गेले. पुन्हा एकदा इराण आक्रमक भूमिकेत बघायला मिळत आहे. अमेरिकेसोबतच्या युद्धात इराणने जगाला पळो की सळो करून सोडले. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली. तेलाच्या भाव प्रचंड वाढत आहे. जर हे युद्ध पुढील काही दिवस असेच चालत राहिले तर त्याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागू शकतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now