विठुरायाची भेट अपूर्णच राहिली! पंढरपुरच्या वारीत ट्रकनं चिरडलं, धाराशिवच्या महिला वारकऱ्याचा अपघाती मृत्यू

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

पंढरीच्या वाटेवरच महिलेनं जीव सोडल्यामुळे इतर वारकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dharashiv: आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. मृदुंगाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा नाद, विठुनामाचा गजर आणि माऊली माऊलीच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या पंढरीच्या वाटेवर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वारीला निघालेल्या धाराशिवच्या एका महिला वारकऱ्याचा वारीच्या मार्गावरच अपघाती मृत्यू झाला आहे. उषा अशोक व्यवहारे (रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. यंदाच्या आषाढी वारीसाठी आपल्या गावातील इतर महिलांसोबत पायी पंढरपूरच्या दिशेने निघाल्या होत्या.

धाराशिवच्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू

पंढरीच्या वाटेवर धाराशिवच्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू झाला. शनिवारी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास वाखरीजवळ रस्त्यावरून जात असताना त्यांना वाहनाने धडक दिली. रोड कॉस करताना महिलेला दिंडीतील वाहनाने(ट्रक) चिरडले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. उषा व्यवहारे यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि वारीत सहभागी झालेल्या इतर महिलां हळहळ व्यक्त करत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस घेऊन पंढरपूरकडे वाटचाल करणाऱ्या उषाताईंना पंढरीच्या विठोबाचे केवळ काही अंतरच उरले होते. पंढरीच्या वाटेवरच महिलेनं जीव सोडल्यामुळे इतर वारकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत असून सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पंढरपूर वारीदरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत

विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी जाणारे हजारो वारकरी  शेकडो मैल अंतर कापत पंढरपुरात येतात . 250 किमीच्या प्रवासात काट्या कुट्यातून,चिखलातून माऊलीचा गजर करत पंढरीच्या वारीला निघतात. यंदा महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून वारीदरम्यान कोणत्याही प्रकारच्या अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे .यासंदर्भातलं नवं परिपत्रक महसूल विभागाने आज जाहीर केला आहे . 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत वारीदरम्यान जर एखाद्या वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा इतर नैसर्गिक कारणामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम मिळणार आहे.

आरोग्य तपासणी

गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon