टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Virat Kohli : लंडनच्या रस्त्यावर अकायसोबत दिसला विराट कोहली, Video व्हायरल

Virat Kohli With Son : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि मुलगा अकाय यांचा लंडनच्या रस्त्यांवरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात विराट अकायसोबत निवांतपणे वेळ घालवताना दिसला. मुलाला प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यासाठी लंडनमध्ये स्थायिक झालेल्या विराट-अनुष्काचे कौटुंबिक क्षण पाहून चाहते थक्क झाले. अकाय किती मोठा झाला हे पाहून अनेकांना आनंद झाला असून, सोशल मीडियावर या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Virat-Anushka Son Akaay Viral Video : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या फॅमिली लाईफमुळे चर्चेत आहेत. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्यांनी लंडनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. मुलांना लाईमलाइट आणि प्रसिद्धीपासून दूर ठेवून नॉर्मल आयुष्य जगता यावं म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. त्यामुळे विराट अनुष्का भारतात कधीतरीच दिसतात. दरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडीो नुकताच समोर आला असून त्यामध्ये तो, त्याचा मुलगा अकायसोबत दिसला, त्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. लंडनच्या रस्त्यांवर तो अकायसोबत निवांत चालताना स्पॉट झाला. वडील आणइ मुलाच्या या क्युट मूमेंट्स कोणीरही फोनमध्ये कॅप्चर केल्या आणि पाहता पाहता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला.

किती मोठ्ठा झाला अकाय !

या व्हिडीोमध्ये विराट कोहली त्याच्या मुलाचं बोट पकडून लंडनच्या रस्त्यावरून निवांत जाताना दिसला. अकाय कधी इकडे तिकडे पळत होता, तर मध्ये बाबांचं बोट पकडत होता. यावेळी विराट समोर असलेल्या का लोकांना हसून अभिवादन करताना, त्यांच्याशी गप्पा मारतनाही दिसला. या व्हिडीओमध्ये विराट अतिशय साध्या, कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसला. कोणताही तामझाम न करतात, सुरक्षेचा गराडा न घेता, तो मुलासोबत निवांतपणे वेळ घालवत जाताना दिसला. त्याचा हा व्हिडीओ एका इसमाने कॅप्चर केला.

 

मात्र हा व्हिडीओ समोर येताच विराट-अनुष्काचे चाहते खूपच खुश झाले असून अकायला पाहून त्यांचे कौतुकोद्गार थांबताना दिसत नाहीत. अकाय किती मोठा झालाय ते पाहून अनेक जण हैराण झालेत, सोशल मीडियावरील या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडलाय. क्रिकेटच्या मैदावनावर आक्रमक दिसणार, जल्लोष करणारा विराटचं हे शांत, कौटुंबिक रुप पाहूनही अनेक जण थक्क झालेत, पण अनेकांना हाँ विराट खूप आवडलाय. सोशल मीडिया हा व्हिडिओ बराच शेअर केला असून विराटचंही भरभरून कौतुक केलंय. एका सुपरस्टारला इतके सामान्य जीवन जगताना पाहून आनंद झाला असंही काहींनी लिहीलं. “किंग विथ लिटिल किंग”, असं एकाने लिहीलं, तर “बेस्ट पापा इन द वर्ल्ड।” असं लिहीत एका युजरने विराटचं कौतुक केलं.

खासगी आयुष्य जपण्यास विराट- अनुष्काचं प्राधान्य

विराट आणि अनुष्का नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप खाजगी राहिले आहेत. त्यांनी अद्याप त्यांची मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना मीडियासमोर आणलेलं नाही, त्यांचे चेहरे सर्वांसमोर उघड केलेले नाहीत. 2017 मध्ये त्यांचं लग्न झालं, त्यानंतर 4 वर्षांनी विराट अनुष्काने 2021 मध्ये मुलगी वामिका हिचं स्वागत केले. तर त्यांचा मुलगा अकाय याचा जन्म फेब्रुवारी 2024 मध्ये झाला. मुलांची प्रायव्हसी राखण्यासाठी त्यांनी लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

होळीनिमित्त विराटचा मेसेज

होळीनिमित्ताने विराटने चाहत्यांची आठवण काढली, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरीही शेअर केली होती. त्याचा हा मेसेज लोकांना खूप आवडला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO