पश्चिम बंगालनंतर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूत अखेर आज टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलपती यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

1/10

पश्चिम बंगालनंतर अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूत अखेर आज टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय थलपती यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
2/10

तामिळनाडूतील जवाहरलालू नेहरु स्टेडियममध्ये राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 108 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या टीव्हीके पक्षाच्या विजय यांनी राजकारणात मोठा करिश्मा करुन दाखवला.
3/10

विजय यांच्या राजकीय एंट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, त्यामुळेच आजच्या त्यांच्या शपथविधीकडे देशाचं लक्ष लागलं होतं. तामिळनाडूत त्याच्या शपथविधी सोहळ्याल मोठी गर्दी होती.
4/10

विजयचे आई,वडिल, पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि चाहत्यांची सभागृहात मोठी गर्दी होती. तर, अभिनेत्री त्रिशाही नव्या नवरीसाठी नटून थटून या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
5/10

काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची उपस्थिती या सोहळ्यात लक्षणीय ठरली. राहुल गांधींनी सर्वांना हात उंचावून अभिवादन केले
6/10

मुख्यमंत्री विजय यांनीही आपल्या प्रत्येक मोमेंटमध्ये राहुल गांधींना आदराचे स्थान देत सन्मान दिला. त्यांच्यासमवेत सेल्फी काढला, आणि हातात हात घेऊन आपल्या चाहत्यांना, व जनतेलाही अभिवादन केले
7/10

शपथविधी सोहळ्यातील लक्षवेधी एंट्री ठरली ती अभिनेत्री त्रिशा हिची, केसावर गोल गजरा आणि आकाशी रंगाच्या साडीत त्रिशाचं सौंदर्य अधिकच खुललं होतं.
8/10

विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी राहुल गांधी यांच्यासह सेल्फी आणि व्हिडिओही स्वत: शूट केले. तसेच, उपस्थित जनतेसोबतही त्यांनी सेल्फी घेत आनंद साजरा केला
9/10

शपथविधी सोहळ्यानंतर विजय यांनी मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी, खुर्चीवर बसण्यापूर्वी विजय भावुक झाले होते, काहीही भारावले होते.
10/10

दरम्यान, विजय यांनी आजपासून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला असून कामजाला सुुुरुवातही केली आहे. त्यांच्याकडून जनतेला आणि राज्याला मोठ्या अपेक्षा आहेत.












