टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Video: काव्या मारनला कोणी दिलं गुलाब? सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर अशा व्यक्त केल्या भावना

आयपीएल 2026 स्पर्धेतील 21वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात पार पडला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थानला पराभवाची धूळ चारली. या विजयानंतर काव्या मारन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: काव्या मारनला कोणी दिलं गुलाब? सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर अशा व्यक्त केल्या भावना

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा विजयी रथ अखेर सनरायझर्स हैदराबादने रोखला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्याने हैदराबादच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. या सामन्यात हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 216 धावा केल्या आणि विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं. पण या धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 159 धावांवर गारद झाला. हा सामना हैदराबादने 57 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत 2 गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली. या विजयानंतर हैदराबाद फ्रेंचायझीची मालकीन असलेल्या काव्या मारन यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. खरं तर या सामन्याची सुरूवात अभिषेक शर्माच्या विकेटने झाली होती. त्यामुळे काव्या मारन थोडी निराश होती. पण नंतर सामन्यात सर्वच घडामोडी आपल्या बाजूने घडत गेल्या आणि काव्या मारन यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं. या विजयानंतर काव्या मारन यांना गुलाब देणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हे गुलाब कोणी दिलं? हैदराबादच्या विजयानंतर कोणी भावना व्यक्त केला? जाणून घेऊयात

कोणी दिलं गुलाबाचं फूल?

आयपीएल स्पर्धेत काव्या मारन या संघाच्या प्रत्येक सामन्यात संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित असतात. संघाचा जय किंवा पराजय झाला तरी त्या खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतात. 13 एप्रिलला राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या दरम्यान त्यांना गुलाब दिल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. काव्या मारन यांना हे गुलाब एका चाहत्याने दिलं. चाहत्याने निळं गुलाब देत आपल्या त्यांच्या आणि संघाप्रती भावना व्यक्त केल्या. निळं गुलाब यासाठीच दिलं जातं. काव्या मारनने चाहत्याकडून गुलाबाचा स्वीकार केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

सामन्यात हैदराबादच्या प्रफुल हिंगे पहिल्या षटकात सामन्यावर पकड मिळवून दिली. या षटकात फक्त 1 धाव दिली आणि तीन फलंदाजांना खातं न खोलता तंबूत पाठवलं. यात वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि ल्हुआन्ड्रे प्रिटोरियस याची विकेट काढली. त्यामुळे काव्या मारन या खूपच आनंदी झाल्या होत्या. कारण या तीन विकेटमुळे राजस्थान रॉयल्सच्या हातून सामना गेला होता. तसेच पावर प्लेमध्ये धावगतीला ब्रेकही लागला. अखेर झालंही तसंच. हा सामना हैदराबादने जिंकला.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now