टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Video: मोठा अपघात! विमान थेट इमारतीला जाऊन धडकलं, अंगावर काटा आणणार व्हिडीओ समोर

On: May 5, 2026 10:36 AM
Follow Us:

Video: एका भयानक विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक विमान शहरातील इमारतीला जाऊन धडकल्याचे स्पष्ट दिसत आहे. नेमकं काय घडलं होतं एकदा पाहा…

Video: मोठा अपघात! विमान थेट इमारतीला जाऊन धडकलं, अंगावर काटा आणणार व्हिडीओ समोर

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत विमान अपघात होत असल्याचे दिसत आहे. आता देखील एक विमान थेट इमारतीला जाऊन धडकले आहे. ब्राझीलमधील बेलो होरिजोंटे या मोठ्या शहरात हा वेदनादायक अपघात घडला आहे. येथे एक छोटे विमान अचानक एका निवासी इमारतीवर जाऊन धडकले. काही क्षणांतच सर्व काही बदलले. धूर, आग आणि किंचाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. या अपघातात किमान ३ जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जर विमानाची दिशा थोडी जरी वेगळी असती, तर नुकसान अधिक भीषण झाले असते.

नेमकं काय घडलं?

सोमवारी ब्राझीलमधील बेलो होरिजोंटे शहरात एक छोटे विमान निवासी इमारतीला धडकले. या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ‘एएफपी’च्या वृत्तानुसार, मिनास जेराइस राज्याच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, पायलट आणि सह-पायलटचा जागीच मृत्यू झाला. विमानात असलेल्या इतर तीन व्यक्तींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

 

स्थानिक हॉस्पिटल फाऊंडेशनच्या माहितीनुसार, जखमींपैकी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर इतर दोन जण रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, विमान थेट इमारतीला धडकले. पण सुदैवाने इमारतीमधील कोणत्याही व्यक्तीला दुखापत झाली नाही आणि इमारत कोसळण्याचा कोणताही “स्पष्ट धोका” नाही. ‘टीव्ही ग्लोबो’ चॅनेलच्या हेलिकॉप्टरने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये विमान हळूहळू खाली येत असल्याचे दिसले, त्यानंतर उंच इमारती टाळण्यासाठी विमान डावीकडे वळले आणि शेवटी एका तीन मजली इमारतीला धडकून पार्किंगमध्ये कोसळले.

अशा प्रकारे वाचले लोकांचे प्राण

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान इमारतीच्या जिन्याच्या भागाला (स्टेअरवेल) धडकले, ज्यामुळे अधिक लोकांचे प्राण वाचू शकले. अग्निशमन विभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘जी१’ न्यूज वेबसाइटला सांगितले की, “जर विमान इमारतीच्या बाजूला धडकले असते, तर ते थेट एखाद्या फ्लॅटमध्ये घुसले असते जिथे लोक हजर होते.” अग्निशमन दलाने जारी केलेल्या छायाचित्रांमध्ये बचावकर्ते इमारतीमधील लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढताना दिसत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now