टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

तामिळनाडूमध्ये विजय पर्व, अभिनेता विजय थलापती यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, थेट हात जोडत..

On: May 10, 2026 12:04 PM
Follow Us:

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना मोठा धक्का बसला. अभिनेता विजय थलापती याच्या पक्षाची धाकू कामगिरी राहिली. अभिनेता विजय याने आता नुकताच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीकरिता राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.

तामिळनाडूमध्ये विजय पर्व, अभिनेता विजय थलापती यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, थेट हात जोडत..

तामिळनाडूसह पश्चिम बंगाल, केरळ, आणि आसाम राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मात्र, या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीची. मोठे सत्तापरिवर्तन तामिळनाडूत झाले. चक्क अभिनेता विजय थलापती याच्या पक्षाने जोरदार कामगिरी केली. विशेष म्हणजे दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी पक्षस्थापन करून झालेला असताना विजय थलापतीच्या पक्षाने थेट तामिळनाडूमध्ये सत्ता मिळवली. अभिनेत्याला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला. आज अभिनेता विजय थलापती याने तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजय थलापती याच्यासोबतच 9 मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय थलापतीसह 9 नवनिर्वाचित मंत्र्यांनी शपथ दिली. सकाळी 10 वाजता हा शपथविधी सोहळा सुरू झाला. या शपथविधी सोहळ्याकडे देशाच्या नजरा होत्या.

राज्यपालांनी विजय यांना विश्वासदर्शक ठराव मागण्यासाठी 13 मे पर्यंत किंवा त्यापूर्वीची मुदत दिली आहे. जोसेफ ऊर्फ थलापती विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय थलापती शपथ घेण्याकरिता उभा राहताच लोकांनी घोषणा देण्यास सुरूवात केली.

या निवडणुकीत विजय थलापती याच्या पक्षाला मोठे यश मिळाले. आता तामिळनाडूमध्ये विजय पर्वाला सुरूवात झाल्याचे बघायला मिळाले. प्रस्थापितांना मोठा धक्का देत तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय थलापती याने धमाका केला. या शपथविधीसाठी राहुल गांधी यांनीही उपस्थिती दर्शवली. तामिळनाडूमध्ये नक्की काय होणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

यावेळी विजय थलापती हात जोडून सर्वांचे आभार मानतानाही दिसला. अखेर अभिनेता विजय थलापती याने तामिळनाडूमध्ये नवीन सरकार स्थापन केले. विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एका काँग्रेस नेत्याने म्हटले, आमचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आम्ही 200 टक्के सरकारचा भाग असू. 59 वर्षांनंतर राज्यात काँग्रेस सत्तेवर येत आहे. विजय थलापती याच्या पक्षाला काँग्रेसने साथ दिली. स्वत: राहुल गांधी या शपथविधीकरिता उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now