Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा अपघात झाला आहे. या हृदयद्रावक घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत.

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात महाराष्ट्रातील भाविकांच्या बसचा अपघात (Accident News) झाला आहे. गुरुवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेत दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 35 प्रवासी जखमी झाले आहेत. वाराणसी-गोरखपूर महामार्गावर (Varanasi-Gorakhpur Highway) भाविकांची पर्यटक बस अनियंत्रित होऊन उलटल्याने हि घटना घडल्याची माहिती आहे. यात बुलढाण्यातील (Buldhana) भाविक – श्रद्धाळूंच्या समावेश असून गाझीपूरजवळ (Ghazipur Accident News) हा अपघात घडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील कारवाई सुरु केलीय. तर जखमींवर सध्या गाझीपूर सिव्हिल रुग्णालयाला उपचार सुरु आहे.
Ghazipur Accident News : 35 यात्रेकरू जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक तर दोन महिलांचे दुर्दैवी निधन
मिळेलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनंतर शिवसेनेची टीम देखील घटनास्थळी पोहचली असून मदत कार्य सध्या सुरु आहे. या बस मध्ये एकूण 38 भाविक असून ते तीर्थदर्शनासाठी निघाले होते. यातील 35 यात्रेकरू जखमी असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर 32 यात्रेकरू किरकोळ जखमी असून दोन महिलांचे दुर्दैवी निधन झाले आहे. यातील एक महिला बुलाढाण्यातील रहिवाशी असून एक अकोला जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, दोन्ही पार्थिव त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आहे.
Accident News : नियंत्रण सुटल्याने बस वेगाने दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच उलटली
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातातील भाविकांची बस चित्रकूट आणि वाराणसीचे दर्शन घेऊन नेपाळमधील काठमांडूच्या दिशेने रवाना झाली होती. दरम्यान, बस चालकाचे बसवरून नियंत्रण सुटल्याने नैसरे गावाजवळ समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस वेगाने दुभाजकाला धडकली आणि महामार्गावरच उलटली. गुरुवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतकार्य सुरु केलं. आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Crime: गतिमंद तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा, विशेष सत्र न्यायालयाचा निकाल
गतिमंद तरुणीवर अत्याचार प्रकरणी गोंदिया येथील विशेष सत्र न्यायालयानं आरोपी नराधमास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमोल तलांजे (३०) असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचं नावं आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-३ तथा विशेष सत्र न्यायाधीश के.एन. गौतम यांनी दिला. आरोपी हा पीडितेच्या घराशेजारी राहतो. पीडिता गतिमंद असल्याचा गैरफायदा घेत त्यानं पिण्याचं पाणी मागण्याचा बहाणा करून तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर जबरदस्तीनं तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली होती. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले असता सर्व साक्ष पुराव्याच्या आधारावर न्यायालयानं आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.







