उन्हाळ्यात अनेकांना केस गळतीचा सामना करावा लागतो. कारण या दिवसांमध्ये स्कॅल्पवरील तेलकटपणामुळे केसांची मुळ कमकुवत होतात आणि केस गळण्यास सुरूवात होते. तर यापासून सुटका मिळवण्यासाठी या बेस्ट हेअर ऑइलचा वापर करा. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
1. खोबरेल तेल
कसे वापरावे :
उन्हाळ्यात केसांना रात्रभर तेल लावून ठेवण्याऐवजी अंघोळीच्या 30 मिनिटे आधी हलक्या हाताने मालिश करणे उत्तम ठरते. यामुळे स्कॅल्पला आराम मिळतो आणि घामामुळे होणारी खाज कमी होते.
2. बदामाचे तेल
तुम्हाला जर केसांसाठी जड तेल आवडत नसतील तर बदामाचं तेल एक उत्तम पर्याय आहे. हे तेल हलकं असतं आणि स्कॅल्पमध्ये पटकन शोषलं जातं. त्यात व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, जे केसांची मुळं मजबूत करतात आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात.
एक छोटीशी टीप :
केस धुतल्यानंतर केसांच्या टोकांना बदामाच्या तेलाचे दोन-तीन थेंब लावल्यास केसांचा कुरळेपणा कमी होतो आणि केस मऊ राहतात.
3. एरंडेल तेल
तुमचे केस जर खुप पातळ झाले असतील किंवा हेअरलाइन मागे सरकत असेल, तर एरंडेल तेल खूप उपयुक्त मानले जाते. त्यातील रिसिनोलिक अॅसिड स्कॅल्पमधील रक्तसंचार वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे केसांच्या मुळांना अधिक पोषण मिळते.
उन्हाळ्यात कसे वापरावे :
एरंडेल तेल बरेच घट्ट असते, त्यामुळे ते थेट लावण्याऐवजी खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलात मिक्स करून लावणे उत्तम ठरेल. यामुळे ते लावणे आणि धुवून काढणे सोपे होते.

4. आवळा तेल
आयुर्वेदात आवळा केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांची मुळे मजबूत करतात आणि केस गळणे कमी करण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात आवळ्याचे तेल लावल्याने स्कॅल्पला थंडावा मिळतो, ज्यामुळे ऊन आणि उष्णतेमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होते. तसेच, यामुळे अकाली केस पांढरे होणे कमी होण्यासही मदत होते.
5. भृंगराज तेल
आयुर्वेदात भृंगराजला केसांचा राजा म्हणूनही ओळखले जाते. हे तेल केसांची मुळे मजबूत करते, टाळूतील रक्तसंचार वाढवते आणि केसांच्या वाढीस मदत करते.
जर तुम्हाला कोंडा, तणाव किंवा हवामानातील बदलांमुळे केस गळतीचा त्रास होत असेल, तर भृंगराज तेल खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच हे तेल लावल्याने स्कॅल्प निरोगी राहण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
हे सुद्धा वाचा
वजन कमी करण्यासाठी धावणे चांगले की चालणे ? जास्त परिणामकारक काय ?











