भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आज विवो आपले दोन शक्तिशाली फोन्स, Vivo X300 Ultra आणि Vivo X300 FE लॉन्च करत आहे. आज दुपारी 2 वाजता हा सोहळा पार पडणार असून, यामध्ये उत्कृष्ट कॅमेरा आणि वेगवान प्रोसेसरसह अनेक प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील. विवो प्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.


Vivo X300 Ultra फीचर्स

- पहिले फीचर्स म्हणजे कॅमेरा, फोनमध्ये 200 मेगापिक्सलचा Sony LYTIA 901 सेन्सर, 50-मेगापिक्सलचा Sony LYTIA 818 अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर मिळेल.
- दुसरे मोठे आणि शक्तिशाली फीचर्स म्हणजे फोनमध्ये आढळणारा प्रोसेसर, या डिव्हाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरेशन 5 चिपसेट मिळेल.
- तिसरी म्हणजे या फोनमध्ये आढळणारी मोठी आणि दमदार बॅटरी, फोनमध्ये लाईफ आणण्यासाठी 6600mAh ची दमदार बॅटरी उपलब्ध असेल.
- चौथे फीचर्स म्हणजे फोनचे फास्ट चार्जिंग. हा फोन 100 वॉट फास्ट चार्ज सपोर्टसह 40 वॉट वायरलेस फ्लॅश चार्ज सपोर्टसह येईल.
- पाचवे फीचर्स म्हणजे या डिव्हाइसला मिळणारे सिक्युरिटी अपडेट. कंपनीने आश्वासन दिले आहे की, या हँडसेटला 7 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट दिले जातील.
Vivo X300 FE स्पेसिफिकेशन्स

- पहिले फीचर्स म्हणजे फोनचा कॅमेरा. मागील बाजूस 50-मेगापिक्सेल Sony IMX921 ZEISS प्राथमिक कॅमेरा, 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेल Sony IMX882 टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आहे जो 3x ऑप्टिकल आणि 100x डिजिटल झूम सपोर्टसह येतो. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सलचा वाइड-अँगल फ्रंट ZEISS कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल.
- दुसरे फीचर्स म्हणजे फोनचा प्रोसेसर. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी विवोचा फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेटचा वापर करतो.
- तिसरे फीचर्स म्हणजे फोनची बॅटरी. फोनमध्ये लाईफ आणण्यासाठी 6500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
- चौथे फीचर्स म्हणजे फास्ट चार्जिंग. या फोनमध्ये 90W फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस फ्लॅश चार्ज, बायपास चार्जिंग आणि ओव्हरहीट प्रोटेक्शन मिळेल.
- पाचवे फीचर्स म्हणजे त्यात आढळणारे शेक अँड शेअर फीचर्स.
बातम्या तुमच्यासाठी
कमलापूरजवळ भीषण अपघात; एसटी चालकासह ७ प्रवासी जखमी
Gold Rate : सराफा बाजारात चमत्कार, सोन्याचा भाव धाडकन आपटला, काही तासात तब्बल…10 ग्रॅमचा भाव किती?














