सांगोला (प्रतिनिधी):- डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेजमध्ये स्व.गणपतराव देशमुख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीमती रतनबाई देशमुख, संस्था सदस्य श्री.चंद्रकांतदादा देशमुख, सौ.शोभाताई देशमुख, सौ.सुरेखाताई चंद्रकांत देशमुख, संस्था अध्यक्ष डॉ अनिकेत देशमुख, डॉ.सौ.आस्था अनिकेत देशमुख, डॉ.सौ.निकिता बाबासाहेब देशमुख, संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे यांच्या शुभहस्ते डॉ.गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सिकंदर मुलाणी, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाचे प्राचार्य प्रा.केशव माने, उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव, उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे, पर्यवेक्षक दशरथ जाधव, तातोबा इमडे सर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिनेश शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सौ.इंदिरा येडगे, सौ स्मिता इंगोले, प्रा.अशोक कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा.सौ.जयश्री पाटील यांनी सांगितले की, आपले संपूर्ण आयुष्य या सांगोला तालुक्यातील गोर गरीब, गरजू, कष्टकरी, शेतकरी, दिनदलित व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी व्यतित केले. यासाठी त्यांनी विधानभवनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून तर कधी पाणी प्रश्नासाठी व विविध मागण्यासाठी आंदोलने करून या जनतेला सर्वतोपरी न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. आबासाहेबांच्या चारित्र्यसंपन्न व निष्कलंक व्यक्तिमत्त्वामुळे सांगोला तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आबासाहेबांना आदर्श मानत आहे, असे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन प्रा दत्तात्रय देशमुख यांनी तर आभार प्रा.संतोष राजगुरू यांनी मानले.