दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
-
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेते आणि मंत्री विजय शाह यांच्यावर 4 तासात गुन्हा दाखल करा: उच्च न्यायालय
-
JNUने तुर्किच्या इनोनू विद्यापीठासोबतचा करार मोडला: म्हटले- आम्ही देशासोबत; चीन-तुर्कियेच्या सरकारी चॅनलच्या X खात्यावरील बंदी हटली
-
पाकला बाप दाखवण्याचे काम भारताने केले: एकनाथ शिंदे यांचे तिरंगा रॅलीत विधान; ऑपरेशन सिंदूरवर राजकारण करणाऱ्यांनाही ठणकावले
-
पाकिस्ताननंतर आता चीनने भारताला डिवचलं, अरुणाचल प्रदेशमधील जागांची नावं बदलली, भारताचं प्रत्युत्तर, म्हणाला, चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत
-
देशाच्या 52 व्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपुत्र; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून न्यायमूर्ती भूषण गवईंना सरन्यायाधीश म्हणून शपथ
-
आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांची सुरक्षा पोलिस कमिशनर, SP करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
-
आमच्या तिघांत आता स्पीड ब्रेकरला जागा नाही: देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना प्रत्युत्तर; तर तिघांची मेट्रो बुलेटच्या स्पीडने काम करणार असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा
-
राज्यातील देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्रीला ब्रेक, शासन धोरण ठरविलं जाईपर्यंत अशा जमिनींची नोंदणी नको;महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश
-
राज्यात गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे शेकडो बनावट खाती, गुजरातचं कनेक्शन समोर; मुंबईतील जुहूमधून तिघांना अटक
-
सांगली कारागृहात नेताना गजा मरणेसोबत मटण पार्टी; एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई
-
काँग्रेस नेत्याचा शरद पवारांच्या भूमिकेला छेद: ‘खासदार हाच जनतेचा खरा प्रतिनिधी’ म्हणत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा पुनरुच्चार
-
लग्नाच्या वरातीत ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात हातात तलवार घेऊन थिरकले, व्हिडीओ वायरल; कारवाई होण्याची शक्यता
-
शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; स्थानिक नेत्यांबद्दल केली तक्रार, म्हणाल्या, मी गद्दारी केली नाही, शिवसेनेतच राहणार
-
खासदार अमोल कोल्हे अन् उत्तम जानकरांनी नाक घासून अजित दादांची माफी मागावी, मगच राष्ट्रवादीच्या एकीची चर्चा; आ. अमोल मिटकरींनी ठेवली अट

-
अजित दादा- सु्प्रिया ताई एकत्र येतील का, तुमच्या मनात काय? पत्रकाराच्या प्रश्नावर अनिल देशमुख मिश्किलपणे म्हणाले, जवळ या तुमच्या कानात सांगतो
-
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकरांनी दिला राजीनामा; पत्रात म्हणाले, समाजकंटकांकडून राजकीय बदनामी झाल्याने व्यथित होऊन निर्णय
-
वसई विरारमध्ये एकाच वेळी 13 ठिकाणी ईडीची छापेमारी, 41 बेकायदेशीर इमारतीप्रकरणी मोठी कारवाई, माजी नगरसेवक सीताराम गुप्तावर गुन्हा दाखल
-
माजी सनदी अधिकारी अजय कुमार UPSC चे नवे अध्यक्ष, संरक्षण मंत्रालयाचे सचिव अन् अग्निवीर योजनेचे निर्माते
-
MBBS च्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवत गळ्यावर चालवली सुरी; चिठ्ठीत शिक्षणमंत्र्यांचा उल्लेख, अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहासा काढून टाकण्याची मागणी
-
बीडमध्ये गतीमंद चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात बांधलं; केळी अन् टरबुजाच्या साली खायला घातल्या, बापाचं पाशवी कृत्य
-
चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन मायदेशी आले!
-
राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, 13 राज्यांमध्ये वादळ-पावसाचा अलर्ट: UP-झारखंडमध्ये दमट हवामान; राजस्थानच्या बाडमेर-जैसलमेरमध्ये तापमान 41 अंशांच्या पुढे
-
विराट कोहलीच्या निवृत्तीमुळे जावेद अख्तर निराश: म्हणाले- ही अकाली निवृत्ती, या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती करतो
-
मोदीजी ने मेरा ‘सिंदूर’ मुझे लौटा दिया; BSF जवानाची पत्नी भावूक, पतीसोबत व्हिडिओ कॉलवरुन संवाद
-
लिव्हिंगस्टनला इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघातून वगळले: हॅरी ब्रुकच्या कायमस्वरूपी नेतृत्वाखाली पहिली मालिका, 29 मे रोजी वेस्ट इंडिजशी सामना
-
रबाडा-एनगिडीसह 8 आयपीएल खेळाडू दक्षिण आफ्रिकेला परतणार: WTC फायनलमध्ये सामील होण्यासाठी बोलावले, 26 मेपर्यंत पोहोचावे लागेल
-
नवीन वेळापत्रकामुळे लीग झाली रोमांचक: शेवटचे 2 दिवस प्लेऑफमधील स्थान निश्चित करतील; कोलकाता-लखनऊ एकही सामना हरल्यास बाहेर
संबंधित बातम्या
मित्रपक्षातील नेत्यांवर हल्लाबोल; एकनाथ शिंदे कारवाई करणार? धंगेकरांनी सगळंच सांगितलं
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 20 ऑक्टोबर 2025 | सोमवार
गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ, सहा मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं
निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं? राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले
Raj Thackeray And Uddhaठाकरे बंधू आज पुन्हा भेटले, राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम




