टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी… ईमेलमध्ये दहशतवाद्याचा उल्लेख

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला आहे. ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना फाशी दिल्याचा उल्लेख करत धमकी देण्यात आली आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ईमेलमध्ये दावा करण्यात आला आहे की ताज हॉटेल आणि विमानतळाला बॉम्बने उडवले जाईल.

मुंबई विमानतळ आणि ताजमहल पॅलेसला बॉम्बने उडवण्याच्या धमकीच्या ईमेलमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपास सुरू झाला आहे. असे सांगितले जात आहे की, ईमेलमध्ये दहशतवादी अफजल गुरु आणि सैवक्कू शंकर यांना “अन्यायाने फाशी दिल्याचा” उल्लेख करत ही धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत.

सुरक्षा यंत्रणा सतर्क

धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून संपूर्ण मुंबईत लष्करी दल तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज हॉटेलवर डॉग स्क्वॉडच्या पथकाने प्रत्येक कोपऱ्याची तपासणी केली आहे. मुंबई पोलिस ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी कार्यरत झाले आहेत. यापूर्वीही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती.

लष्कराने दहशतवाद्यांचा बदला घेतला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेसंदर्भात विशेष खबरदारी घेतली जात आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केली होती. मृतांमध्ये अनेकजण महाराष्ट्रातील होते. भारताने या हल्ल्याचा बदला पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून घेतला होता. भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते, ज्यामध्ये 100 हून अधिक लोक मारले गेले होते.

आणखी वाचा

‘ते’ नाव पाहून काँग्रेसला धक्का, भाजपच्या खेळीने आश्चर्यचकीत; चार नावे दिली त्यातील…

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

US-Iran : इराणला सर्वात मोठा धक्का… हाहा:कार की शरणागती? इस्लामाबाद मिटिंगपूर्वीच मोठा ट्विस्ट; जगातील हा बलाढ्य नेता…

विलासराव देशमुखांबद्दल संजूबाबाने असं काही म्हटलं..; ऐकून रितेश देशमुखला अश्रू अनावर, जिनिलियाही भावूक

Horoscope Today 21st April 2026 : या तीन राशींचे दारिद्रय कायमचे जाणार, पैशांचा वर्षाव होणार; तुम्ही तर भाग्यवंत नाहीत ना?

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या…

भारतीय जहाजावरील गोळीबारानंतर सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट इराणच्या..

Gold Price Today : सकाळीच आली गुड न्यूज! सोन्याच्या भावात आजही घसरण, 10 ग्रॅम सोनं आता…