आकाशातून वीज पडल्यानंतरच जमिनीच्या आत उगवते ही भाजी; किंमत आणि फायदे जाणून थक्क व्हाल

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

पावसाळ्यातच फक्त बाजारात येणारी एक अशी भाजी जिची किमंत थेट काजू-बदामच्या किंमतीएवढी असते. मुख्य म्हणजे ही भाजी फक्त मुसळधार पावसात आणि विज जमिनिवर पडल्यावरच उगवते. आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानली जाते.  कोणती आहे ती भाजी माहितीये.

पावसाळ्यात पालेभाज्या महाग होतात. भाज्यांच्या किंमती या प्रचंड वाढतात तरी किंवा कमी तरी होतात. पण पावसाळ्यात भाज्या खरेदी कराताना कायम काळजी घ्यावी लागते. तसेच पावसाळा म्हटलं की श्रावण महिनाही येतो. त्यामुळे नॉनवेज खाणे देखील लोकं टाळतात.आणि त्याला पर्यायी भाजी शोधतात. पण तुम्हाला माहित आहे का की, एक अशी भाजी आहे जी फक्त पावसाळ्यातच उगवतात आणि त्या भाज्यांना प्रचंड मागणी असते. मागणी प्रमाणे या भाज्यांच्या किंमती देखील वाढतात.

भाजीला शाकाहारी मटण देखील म्हणतात 

या खास प्रकारच्या भाजीची किंमत 100, 200 किंवा 300 रुपये प्रति किलो नाही तर 1000 ते 12000 रुपये प्रति किलो आहे. तरीही, लोक ती खरेदी करण्यासाठी वर्षभर वाट पाहतात. विविध जिल्ह्यांच्या बाजारपेठेत ही खास प्रकारची भाजी आली आहे. या भाजीला शाकाहारी मटण देखील म्हणतात. विशेष म्हणजे ही भाजी शेतात उगवत नाही. या भाजीचे नाव आहे रुगडा. या भाजीची किंमत जास्त आहे त्यामुळे त्याची चर्चा नाही तर त्याच्या अद्भुत चवीमुळेही तिला मोठी मागणी आहे.ही भाजी केवळ जीवनसत्त्वे आणि प्रथिने समृद्ध नाही तर रक्तदाब आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठीही रामबाण उपाय मानली जाते.

Rugda vegetable

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी भाजी

डॉक्टरांचा असाही विश्वास आहे की रुगडाच्या सेवनाने मानवी रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॉपर देखील आढळतात. त्यात कॅलरीज खूप कमी प्रमाणात असतात. खरं तर, ‘रुगडा’ ही मशरूम प्रजातीची भाजी मानली जाते, परंतु ती मशरूमसारखी जमिनीच्या वर वाढत नाही. उलट, ती जमिनीच्या आत तयार होते, जी जून आणि जुलैमध्ये म्हणजेच फक्त 2 महिन्यांत मुसळधार पाऊस आणि वीज पडल्याने सखुआच्या झाडाभोवतीची जमीनीच्या आत उगवते मग ती हळूहळू जमिनीच्या बाहेर येऊ लागते.

भाजीची किंमत?

गावकऱ्यांच्या मते, जितका जास्त पाऊस आणि वादळ असेल तितकेच सखुआच्या जंगलातून आणि सखुआच्या झाडाभोवतीच्या जमिनीतून रुगडा बाहेर पडते. बरेच लोक या भाजीला भूमिगत मशरूम म्हणून देखील ओळखतात. रुगडाच्या 12 प्रजाती आहेत, त्यापैकी पांढरा रुगडा, सर्वात पौष्टिक मानला जातो. झारखंडची समृद्ध अन्न संस्कृती जिवंत ठेवण्यात तसेच झारखंडच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात ही भाजी महत्त्वाची भूमिका बजावते. या भाजीची किंमत 50 किंवा 100 रुपये प्रति किलो नाही तर 1000 ते 1200 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे तुम्हाला देखील बाजारात ही भाजी कधी दिसली तर एकदा नक्कीच आरोग्यदायी भाजी ट्राय करा.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon