हवामान विभागाकडून पुन्हा एकदा भीषण अशा चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे, गेल्या 50 वर्षांमध्ये असं चक्रीवादळ पाहिलं नव्हतं, एवढं मोठं हे चक्रीवादळ असणार आहे.
-
अल्फ्रेड असं या चक्रीवादळाचं नाव आहे, शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे सहावाजेदरम्यान हे चक्रीवादळ समुद्र किनाऱ्याला धडकणार आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
-
-
या चक्रीवादळाचा वेग तब्बल 95 ते 100 किलोमीटर प्रती तास इतका असणार आहे. या चक्रीवादळामुळे जवळपास 25 लाख लोकांवर मोठं संकट निर्माण झालं आहे.
-
-
हे चक्रीवादळ ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आहे. सध्या ब्रिस्बेन शहराकडे या चक्रीवादळाची वाटचाल सुरू असून, शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.
-
-
गेल्या 50 वर्षांमधील हे सर्वात मोठं चक्रीवादळ असून, तब्बल 25 लाख लोकांना या चक्रीवादळाचा तडाखा बसणार आहे. लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचं काम सुरू असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
-
-
ऑस्ट्रेलियांच्या हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यावर प्रचंड उंचीच्या लाटा निर्माण झाल्या आहेत. तब्बल 12.3 मीटर उंचीच्या या लाटा निर्माण झाल्या आहेत.
-
-
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कोणही समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असा इशारा तेथील स्थानिक सरकारकडून देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.