कमलापूर – विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास करणे, त्यांच्यात जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे, या उद्देशाने सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य असा स्टुडंट कौन्सिल शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. दिनांक 25 जून 2025 रोजी हा सोहळा अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
प्रमुख पाहुणे सांगोला तालुक्याच्या पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल चव्हाण मॅडम होत्या. या प्रसंगी सिंहगड इन्स्टिट्यूट कमलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री.अशोक नवले सर आणि शाळेच्या प्राचार्या चेताली मराठे मॅडम देखील मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या असेम्ब्लीने झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर प्रार्थना सादर केली. त्यानंतर दीपप्रज्वलन समारंभ प्रमुख पाहुणे पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चव्हाण मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. पुढे निवडून आलेल्या स्टुडंट कौन्सिल सदस्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी इलेक्शन पद्धतीने मतदान करून प्रतिनिधींची निवड केली होती. यामुळे त्यांना लोकशाही प्रक्रिया समजून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमात अग्नी हाऊस, आकाश हाऊस, पृथ्वी हाऊस, त्रिशूल हाऊस या चार संघांचे प्रतिनिधी विद्यार्थीहेड बॉय, हेड गर्ल, कलचरल कॅप्टन, डेप्युटी कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन अशा विविध पदांवर विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. शपथविधीच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी देश, शाळा आणि आपले पद याबाबत निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा घेतली. ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या हाऊसचा झेंडा अभिमानाने फडकावतपुढील वर्षभरासाठी शाळेच्या विविध उपक्रमांत नेतृत्व करण्याची शपथ घेतली.
पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल चव्हाण मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना त्यांनी लोकशाही व्यवस्थेतील नागरिकांची जबाबदारी, नैतिकता आणि प्रामाणिकपणाचे मोल पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत म्हटले की, नेतृत्व ही जबाबदारीची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी आदर्श वागणूक ठेवून इतरांसाठी प्रेरणा व्हावे, हेच खरे नेतृत्वाचे लक्षण आहे.
शपथविधी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अतिशय शिस्तबद्ध, आत्मविश्वासपूर्ण आणि समर्पित सादरीकरण सादर केले. त्यांच्या प्रत्येक कृतीत जबाबदारी, नेतृत्वगुण आणि संघभावनेचे दर्शन घडले. या उत्कृष्ट सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांनी उपस्थित पाहुणे व पालक यांचे मन जिंकले.
यावेळी विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते. विशेष म्हणजे, पालकांनीच आपल्या पाल्यांना सन्मानचिन्ह म्हणून बॅजेस लावून गौरव केला.आपल्या मुलांना मंचावर नेतृत्वाच्या भूमिकेत पाहणे आणि त्यांना स्वतःच्या हस्ते बॅज प्रदान करणे, हे प्रत्येक पालकासाठी अत्यंत अभिमानाचे आणि भावनिक क्षण होते.हा शपथविधी सोहळा पालकांसाठी एक अविस्मरणीय आणि आनंददायी अनुभव ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचार्यांनी मोलाचे सहकार्य दिले.
प्राचार्या चैताली मराठे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर चारित्र्य, नेतृत्वगुण आणि जबाबदारी यामध्येही प्रावीण्य मिळवावे, हेच आमचे/आमच्या शाळेचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाच्या शेवटी कॅम्पस डायरेक्टर श्री.अशोक नवले सर यांनी सर्व विद्यार्थी प्रतिनिधींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या जबाबदार्या योग्य रीतीने पार पाडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हा संपूर्ण शपथविधी सोहळा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी संस्मरणीय ठरला.अशा उपक्रमांमुळे शाळेचा शैक्षणिक व नैतिक दर्जा उंचावण्यास मदत होत असून, समाजात जबाबदार नागरिक घडवण्याचे काम सिंहगड पब्लिक स्कूल कमलापूर सातत्याने करत आहे. नव्या जबाबदार्या स्वीकारणार्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
मोहन हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ.प्रदीप देवकते यांचेकडून हृदयविकाराच्या तज्ज्ञ सेवा